The path to financial independence... sakal
Personal Finance

मार्ग आर्थिक स्वावलंबनाचा...

भारताच्या विकसित होत असलेल्या सामाजिक-आर्थिक परिदृश्यात, महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचे महत्त्व फार मोठे आहे. आर्थिक स्वातंत्र्यामुळे महिला वैयक्तिकरित्या सशक्त बनतात आणि कुटुंब व समाज यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी योगदान देऊ शकतात.

सकाळ वृत्तसेवा

अर्थभान

अभिजित गुलाणीकर , अध्यक्ष, व्यवसाय धोरण विभाग, एसबीआय लाइफ इन्शुरन्स

भारताच्या विकसित होत असलेल्या सामाजिक-आर्थिक परिदृश्यात, महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचे महत्त्व फार मोठे आहे. आर्थिक स्वातंत्र्यामुळे महिला वैयक्तिकरित्या सशक्त बनतात आणि कुटुंब व समाज यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी योगदान देऊ शकतात. संवेदनशीलता, वेळेचे व्यवस्थापन, बचतीची सवय, एका वेळी अनेक कामे करण्याची (मल्टीटास्किंगची) क्षमता आणि प्रभावीपणे संवाद साधण्याची कला अशा विविध गुणांच्या बळावर त्या उत्तम आयुर्विमा सल्लागार होऊ शकतात.

आयुर्विमा सल्लागार या नात्याने, त्या ग्राहकांच्या गरजा व चिंता सखोलपणे समजून घेऊन त्यांना सुयोग्य असा विमा प्रदान करू शकतात. रक्षाबंधनाच्या सणाचे औचित्य साधून महिलांना आर्थिक स्वावलंबनाबरोबरच सुरक्षेचे कवच इतरांना देण्यासाठी सक्षम करण्याकरिता विमा सल्लागार होण्याची संधी उपलब्ध करणे ही अत्यंत उत्तम भेट आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन आपल्या भावांना, कुटुंबालाच नव्हे, तर संपूर्ण समाजाला योग्य विमाकवच देऊन रक्षाबंधनाच्या सणाचे महत्त्व आणि बदलत्या काळातील महिलांचे सामर्थ्य खऱ्या अर्थाने समाजापुढे आणू शकतील.

कौशल्यांचे सामर्थ्य

महिला घरगुती खर्चही उत्कृष्टरित्या सांभाळतात. त्या दृष्टीने त्या प्रतिभाशाली व्यवस्थापक असतात. अशा प्रकारे, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याच्या पहिल्या पायरीवर त्या पात्र ठरतात. आर्थिक स्वातंत्र्याची दुसरी पायरी आहे त्यांच्या उत्पन्नाचा प्रवाह आणि तिसरी पायरी असते दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेली गुंतवणूक किंवा बचत! या कौशल्यांमुळे त्या आयुर्विमा सल्लागाराचा व्यवसाय सहज करू शकतात. हा व्यवसाय करताना महिलांना स्वतःचे वेळापत्रक हवे तसे व्यवस्थापित करता येते.

घरून काम करणे, तसेच सोयीस्कर ठिकाणी ग्राहकांना भेटता येणे अशा व्यावसायिक स्वरुपामुळे वैयक्तिक जबाबदाऱ्यांसाठी पुरेसा वेळ देणे शक्य होते आणि त्याचवेळी व्यावसायिक आकांक्षाही बाळगता येतात. या कामाचा समाजावर सकारात्मक प्रभाव पडतो, हे याचे खास वैशिष्ट्य आहे. आयुर्विमा सल्लागार म्हणून महिलांना त्यांच्या समुदायात मानाचे स्थान मिळते, त्या इतरांना आर्थिक शक्ती प्राप्त करण्यात मदत करू शकतात. आयुर्विमा सल्लागार या नात्याने महिला स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याबरोबरच इतरांनाही सक्षम बनवतात.

आयुर्विमा सल्लागार म्हणून काम करताना महिलांना त्यांच्या अंगभूत कौशल्यांचा फायदा घेऊन अधिकाधिक आर्थिक स्थैर्य आणि वैयक्तिक प्रगती साध्य करता येते. आर्थिक शक्ती प्राप्त करण्याच्या दिशेने होणारा हा प्रवास केवळ पैसे कमावण्यापुरता नसून आत्मविश्वास, स्वायत्तता आणि नशीब घडवण्याची क्षमता मिळवून देणारा असतो. इतकेच नव्हे, तर समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणारा हा व्यवसाय आहे. त्यामुळे महिलांसाठी आयुर्विमा सल्लागार बनणे हा उत्तम पर्याय आहे, हे मी अगदी ठामपणे सांगू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Adani Group: अदानींना एकाच वेळी 3 मोठे झटके, 600 दशलक्ष डॉलरची योजना रद्द, केनिया करारही रद्द आणि...

Nashik Vidhan Sabha Election 2024 : वाढलेला टक्का, कोणाच्या छातीत कळ, कुणाला पाठबळ..? उमेदवारांमध्येच चर्चा

केवळ तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं... प्राजक्ता माळीची इन्स्टावर नवी पोस्ट, हसऱ्या चेहऱ्याने दिली आनंदाची बातमी

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? बुकींची कोणाला पसंती? मविआ महायुतीला सट्टाबाजारात किती मिळतोय भाव?

SCROLL FOR NEXT