EPFO Partial Withdrawal Limit Sakal
Personal Finance

EPFO: पीएफ नियमांमध्ये मोठा बदल; पैसे काढण्याबाबतचे नियम बदलले, एवढी रक्कम काढता येणार

EPFO Partial Withdrawal Limit: ईपीएफओमध्ये नोकरी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. EPFO ने पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. आता ईपीएफ काढण्याची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. EPFO ने वैद्यकीय संबंधित आगाऊ पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत.

राहुल शेळके

EPFO Partial Withdrawal Limit: ईपीएफओने नोकरी करणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. EPFO ने पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. आता ईपीएफ काढण्याची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. EPFO ने वैद्यकीय संबंधित आगाऊ पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत.

यापूर्वी ही दाव्याची मर्यादा 50,000 रुपये होती ती आता 1 लाख रुपये करण्यात आली आहे. ईपीएफओने 16 एप्रिल रोजी जारी केलेल्या परिपत्रकातून ही माहिती दिली आहे. EPFO ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार आता तुम्ही 1 लाख रुपये काढू शकता.

पैसे काढण्यासाठी फॉर्म 31 आवश्यक

EPFO ने फॉर्म 31 च्या पॅरा 68J अंतर्गत पैसे काढण्याची मर्यादा दुप्पट केली आहे. EPF चा फॉर्म 31 आंशिक पैसे काढण्यासाठी आहे. हा फॉर्म अनेक कारणांसाठी वेळेपूर्वी पैसे काढण्यासाठी वापरला जातो. यामध्ये तुम्ही घर बांधण्यासाठी, घर खरेदी करण्यासाठी, लग्न करण्यासाठी आणि उपचार घेण्यासाठी पैसे काढू शकता. (EPF rule change Now you can claim partial withdrawal up to 1 lakh for medical treatment)

फॉर्म 31 चा पॅरा 68J आजाराच्या उपचारासाठी आंशिक रक्कम काढण्यासाठी वापरला जातो. या अंतर्गत, पूर्वी तुम्ही फक्त 50,000 रुपये काढू शकत होते, परंतु आता तुम्ही 1 लाख रुपये काढू शकता.

कोणत्या परिस्थितीत दावा केला जाऊ शकतो?

ईपीएफओच्या म्हणण्यानुसार खातेदार हे पैसे केवळ जीवघेण्या आजारांसाठी वापरू शकतात. कर्मचारी किंवा त्याचा रुग्ण रुग्णालयात दाखल असताना तुम्ही पैसेही काढू शकता.

कर्मचाऱ्याला सरकारी रुग्णालयात किंवा सरकारशी संबंधित कोणत्याही रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. त्याच वेळी, जर तुम्ही रुग्णाला खाजगी रुग्णालयात दाखल केले असेल, तर प्रथम त्याची तपासणी केली जाईल आणि नंतर तुम्ही दावा करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT