New EPF Rules
New EPF Rules Sakal
Personal Finance

EPFO: ईपीएफओने दिला कोट्यवधी ग्राहकांना दिलासा; क्लेम सेटलमेंटसाठी 'ही' कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत

राहुल शेळके

New EPF Rules: ईपीएफओने आपल्या करोडो ग्राहकांना दिलासा दिला आहे. काही प्रकरणांमध्ये, रद्द केलेल्या चेकबुकचा फोटो किंवा बँक पासबुक अपलोड करणे यापुढे आवश्यक असणार नाही. ईपीएफओने म्हटले आहे की, ज्या प्रकरणांमध्ये इतर सर्व अटींची पूर्तता केली जाते. तेथे क्लेम सेटलमेंट प्रक्रियेदरम्यान चेकबुक किंवा बँक पासबुकचा फोटो अपलोड करण्यास सूट दिली जाते. यामुळे ऑनलाइन दाखल केलेले दावे लवकर मिळण्यास मदत होईल. बहुतेक प्रकरणांमध्ये, चेकबुकचा फोटो किंवा प्रमाणित बँक पासबुक कॉपी अपलोड न केल्यास दावे नाकारले जातात.

ईपीएफओने 28 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकात ही माहिती दिली आहे. ऑनलाइन दाखल केलेले दावे लवकर निकाली काढण्यासाठी चेक किंवा बँक पासबुकचा फोटो अपलोड न केल्यामुळे नाकारल्या जाणाऱ्या दाव्यांची संख्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सीपीएफसीकडून मंजुरी घेण्यात आली आहे.

परंतु ही सवलत काही प्रकरणांमध्येच दिली जाते. म्हणजेच ही सवलत फक्त त्या सदस्यांनाच मिळेल ज्यांची इतर वैधता पूर्ण झाली आहे. यामध्ये संबंधित बँक किंवा NPCI द्वारे बँक KYC ची ऑनलाइन पडताळणी, DSC वापरून बँक KYC ची पडताळणी आणि UADAI द्वारे सीडेड आधार क्रमांकाची पडताळणी यांचा समावेश आहे.

क्लेम सेटलमेंटच्या बाबतीत बँक केवायसी ऑनलाइन असेल. त्यावर संबंधित संस्थेच्या अधिकृत व्यक्तीची डिजिटल स्वाक्षरी असेल. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्याला चेकबुक किंवा बँक पासबुकचा फोटो अपलोड करण्याची गरज भासणार नाही. 'कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने'ने आपल्या सर्व प्रादेशिक कार्यालयांना याबाबत माहिती दिली आहे. ईपीएफओने सर्व कार्यालयांना ईमेलद्वारे अधिसूचना जारी केली आहे.

नवीन सॉफ्टवेअर अंतर्गत, आता संबंधित एक संदेश येईल की बँकेने पडताळणी केली आहे. हा दावा प्रक्रिया करण्यायोग्य आहे की नाही. त्याच वेळी, या प्रकरणात चेकबुक किंवा बँक पासबुकचा फोटो अपलोड करण्याची आवश्यकता आहे की नाही असा संदेश देखील मिळेल. आता, नवीन प्रक्रियेद्वारे, दावा निकाली काढण्याची फाइल केवळ चेकबुक किंवा बँकेच्या पासबुकचा फोटो अपलोड न केल्यामुळे नाकारली जाणार नाही.

काही काळानंतर, जेव्हा वेबसाइटवर दावा निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू होईल, तेव्हा त्यात एक वेगळा रंग दिसेल. तो रंग पाहून संबंधित ग्राहकाला समजेल की या प्रकरणात चेकबुक किंवा बँकेच्या पासबुकचा फोटो अपलोड करण्याची गरज नाही. जोपर्यंत कलर कोडिंग होत नाही, तोपर्यंत या प्रकरणात चेक किंवा बँकेच्या पासबुकचा फोटो लावणे बंधनकारक आहे की नाही, याची काळजी संबंधित ग्राहक घेतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार विधानसभेच्या कामाला! पुण्यात दोन माजी आमदारांनी घेतली पवारांची भेट

Team India’s Jersey: काय सांगता? टीम इंडियाच्या जर्सीमध्ये मोठी चूक? वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोणीच दिले नाही लक्ष

Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी विनेश फोगटची सुवर्ण बाजी, मारियाला हरवून जिंकली स्पेन ग्रांप्री कुस्ती स्पर्धा

Mahayuti Sarkar: महाराष्ट्राला गतिशील करण्याचा आमच्या सरकारचा संकल्प; आ. रणधीर सावरकरांचा दावा

Police Bharti : पोलिस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीत धावताना तरुणाचा मृत्यू; पोलिस मुख्यालयातील घटना

SCROLL FOR NEXT