Every Hour 23 workers lost their jobs in the last 2 years, with more layoffs to come  Sakal
Personal Finance

Layoff: गेल्या 2 वर्षांत दर तासाला 23 कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी, भविष्यात होणार आणखी कर्मचारी कपात

Layoff: गेल्या दोन वर्षात जगभरातील मोठ्या टेक कंपन्यांनी जवळपास चार लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

राहुल शेळके

Layoff: गेल्या दोन वर्षात जगभरातील मोठ्या टेक कंपन्यांनी जवळपास चार लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. अशा परिस्थितीत तंत्रज्ञान कंपन्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी का करावी लागत आहे आणि त्याचा किती मोठा परिणाम होईल, असा प्रश्न उपस्थित होतो.

तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्यांमधील कपातीचा मागोवा घेणारी वेबसाइट layoff.fyi च्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जागतिक स्तरावर 2,120 तंत्रज्ञान कंपन्यांनी 4,04,962 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

2022 मध्ये, 1,061 टेक कंपन्यांनी 1,64,769 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. तर 2023 मध्ये (13 ऑक्टोबरपर्यंत) 1,059 कंपन्यांनी 2,40,193 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.

गेल्या दोन वर्षांत दररोज सरासरी 555 कर्मचार्‍यांच्या नोकऱ्या गेल्या किंवा दर तासाला 23 कर्मचार्‍यांनी नोकरी गमावली आहे. एकट्या जानेवारी महिन्यात 89,554 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात 4,632nकर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले.

क्षेत्रांच्या बाबतीत, तंत्रज्ञान क्षेत्रात या वर्षी सर्वाधिक कर्मचारी काढून टाकले. आकडेवारीनुसार, रिटेल टेकने सुमारे 29,161 कर्मचारी आणि कंज्यूमर टेक उद्योगांनी 28,873 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. 2023 हे वर्ष अद्याप संपले नसल्यामुळे, उर्वरित कालावधीत आणखी कर्मचारी कपात होऊ शकते.

तंत्रज्ञान कंपन्या कर्मचारी कपात का करत आहेत?

बहुतेक टेक कंपन्या जाहिरातींद्वारे पैसे कमवतात. अशा वेळी, जोपर्यंत उत्पन्न येत होते तोपर्यंत टेक कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांवरचा खर्च वाढवत होत्या. मात्र, गेल्या वर्षी जागतिक मंदीच्या भीतीने जाहिरातींच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला.

अशा परिस्थितीत टेक कंपन्यांना कर्मचारी कपात करणे गरजेचे झाले. तसेच जागतिक मंदीमुळे बाजारातील मागणी कमी झाली त्यामुळे मागणी कमी असेल तर पुरवठा कमी होतो आणि कंपन्यांचे नुकसान होते. नुकसान/खर्च कमी करण्यासाठी कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील घसरण थांबणार का? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

SCROLL FOR NEXT