EY employee death FM Sitharaman  Sakal
Personal Finance

EY Employee Death: 'कामाच्या ताणामुळे' CAचा मृत्यू... निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्याने उडाली खळबळ

राहुल शेळके

EY Employee Death: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये तणाव व्यवस्थापन हा विषय शिकवण्याबाबत वक्तव्य केले आहे. यामुळे विद्यार्थी खंबीर होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अर्न्स्ट अँड यंग (EY) नावाच्या कंपनीत काम करणाऱ्या तरुण सीएच्या मृत्यूनंतर सीतारामन यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्ष काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने त्यांच्या वक्तव्याचे वर्णन 'क्रूर' असे केले आहे.

2023 मध्ये CA परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सुमारे चार महिने EY च्या पुणे कार्यालयात काम करणाऱ्या अ‍ॅना सेबॅस्टियन पेरायिल यांचा जुलैमध्ये मृत्यू झाला.

अ‍ॅनाच्या आईने EY इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमाणी यांना पत्र लिहून म्हटले होते की, नवीन कर्मचारी म्हणून अ‍ॅनावर जास्त कामाचा भार देण्यात आला होता, ज्याचा तिच्यावर 'शारीरिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या' परिणाम झाला. प्रख्यात अकाउंटिंग फर्म EY मधील कामकाजाच्या वातावरणाची चौकशी करणार असल्याचे सांगून सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप केला.

काय म्हणाल्या अर्थमंत्री?

शनिवारी एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना सीतारामन यांनी 26 वर्षीय महिला कामगाराचा उल्लेख केला. मात्र, त्यांनी कामगार आणि त्यांच्या काम करणाऱ्या कंपनीचे नाव सांगितले नाही.

सीतारामन म्हणाल्या, '...गेल्या दोन दिवसांपासून एका मुद्द्यावर चर्चा होत आहे. आमची मुलं महाविद्यालयात किंवा विद्यापीठात शिक्षणासाठी जातात आणि तिथून शिक्षण घेऊन बाहेर पडतात. सीएचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीला कंपनीत कामाचा ताण सहन करता येत नव्हता. दबाव सहन न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी दोन-तीन दिवसांपूर्वी आम्हाला मिळाली.

शैक्षणिक संस्था आणि कुटुंबांनी मुलांना तणाव व्यवस्थापन शिकवले पाहिजेत आणि त्यांना सांगितले पाहिजे की, तुम्ही कोणताही अभ्यास करा, कोणतीही नोकरी करा, त्यासोबतचा ताण सहन करण्याची शक्ती तुमच्यात असली पाहिजे.

काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी या टिप्पणीवरून सीतारामन यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, 'सत्ताधारी पक्ष आणि अर्थमंत्र्यांना फक्त अदानी आणि अंबानींसारख्या कॉर्पोरेट दिग्गजांचे दुखणे दिसते, कष्टकरी तरुण पिढीचे नाही.

या ऐतिहासिक बेरोजगारीच्या युगात अ‍ॅनासारख्या प्रतिभावंत मुलीला नोकरी मिळाली असली तरी लोभी कॉर्पोरेट कंपन्यांकडून त्यांचे शोषण होत आहे.

वेणुगोपाल यांनी 'X' वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, अ‍ॅनाला घरीच तणाव व्यवस्थापन कौशल्ये शिकवायला हवी होती, असे सांगून अ‍ॅना आणि त्यांच्या कुटुंबाला दोष देणे हे अर्थमंत्र्यांचे वक्तव्य अत्यंत क्रूर आहे. पीडितेला दोष देण्याचा हा प्रकार घृणास्पद आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarpanch Remuneration: सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Ladki Bahin Yojna: 'या' तारखेला येणार लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता; मंत्री तटकरे यांची माहिती

Supreme Court : चाइल्ड पॉर्नोग्राफी डाऊनलोड करणे गुन्हा, मग कोणी व्हॉट्सॲपवर पाठवलं तर? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय काय सांगतो?

आबरा का डाबरा! Rohit Shrama ने सामना सुरू असताना केली बेल्सची अदलाबदल; Video Viral

Latest Maharashtra News Updates Live: लोकलमध्ये सापडली 20 लाखांची रोकड असलेली बॅग

SCROLL FOR NEXT