EY Pune Employee Death: पुण्यातील अर्न्स्ट अँड यंग (EY) कंपनीच्या 26 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने बॉसला पत्र लिहून आपल्या मुलीला न्याय देण्याची मागणी केली आहे. हे पत्र व्हायरल झाल्यानंतर कंपनीच्या वर्क कल्चरबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, EY कंपनीच्या ऑफिस वर्क कल्चरबद्दल अश्नीर ग्रोव्हरने जे सांगितले होते ते आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये, ग्रोव्हर EY कंपनीबद्दल म्हणत आहे, मी पटकन ऑफिसला गेलो, छातीत दुखण्याचे कारण बनवले आणि लवकरच तेथून निघालो. तो पुढे म्हणाला, इतके मेलेले लोक, फक्त अंतिम संस्कार करायचे बाकी होते, सर्व मृतदेह तिथेच पडले होते.
अर्न्स्ट अँड यंग कंपनीबद्दलचा अनुभव सांगताना ग्रोव्हर म्हणाला की, ऑफिसचे वातावरण अतिशय शांत होते. मी घाईघाईने ऑफिसला गेलो, छातीत दुखत असल्याचं नाटक करून तिथून निघालो, असंही तो म्हणाला. ही क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सीए ॲना सेबॅस्टियन यांच्या दुःखद मृत्यूने कंपनीच्या कार्यालयीन वातावरणाकडे लक्ष वेधले आहे. ॲनाची आई अनिता सेबॅस्टियन यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी कंपनीच्या वर्क कल्चरला जबाबदार धरले आहे. त्यांनी यासंदर्भात कंपनीचे अध्यक्ष राजीव मेमाणी यांना पत्र लिहिले आहे. आपल्या मुलीला न्याय देण्याची मागणी त्यांनी पत्रात केली आहे.
यासोबतच कामासाठी अधिक दबाव निर्माण करत असल्याची टीकाही कंपनीवर होत आहे. कंपनीच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कामाच्या ताणामुळे आपल्या मुलीचा मृत्यू कसा झाला हे त्यांनी पत्रात सांगितले आहे. तिच्या आईचा आरोप आहे की कामाच्या ताणामुळेच तिच्या मुलीचा मृत्यू झाला.
हे पत्र व्हायरल झाल्यानंतर, माजी EY कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वतःचे त्रासदायक अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कर्मचाऱ्याच्या मृत्यूबाबत कंपनीच्या अधिकृत वक्तव्यावरही लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
अर्न्स्ट अँड यंग इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमानी यांनी ॲनाच्या मृत्यूमागे 'वर्क लोड' हे कारण असल्याचा दावा फेटाळून लावला. पीडितेच्या आईने लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कंपनीने हे निवेदन जारी केले आहे.
या विषयावर बोलताना अध्यक्ष राजीव मेमाणी म्हणाले, "ॲनाला इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच काम सोपवण्यात आले होते आणि कामाच्या ताणामुळे महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यताही त्यांनी फेटाळून लावली."
लोक कंपनीकडून जबाबदारीची मागणी करत आहेत. कंपनीने लवकरात लवकर आपली कार्यसंस्कृती बदलली पाहिजे, असे लोकांचे म्हणणे आहे. यानंतर सोशल मीडियावर कंपनीवर टीका होत आहे.
या सगळ्यामध्ये भारत पेचे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांचा एक व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. क्लिपमध्ये, ग्रोव्हर 2017 चा काळ सांगत आहेत. एका कार्यक्रमात ते सांगत आहेत की, ब्लिंकिटचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना अर्न्स्ट अँड यंग कंपनीने 1 कोटी रुपयांचे पॅकेज ऑफर केले होते.
ग्रोव्हरचे अर्न्स्ट अँड यंग कंपनीबद्दलच्या मतानंतर उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवल्या. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे लोकांमध्ये वर्क कल्चर, आणि कामाचे संतुलन याबाबत वादाला तोंड फुटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.