Farmer Home Loan Sakal
Personal Finance

Farmer Home Loan: शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी मिळणार 50 लाखांपर्यंतचे कर्ज; असा करा अर्ज?

राहुल शेळके

Farmer Home Loan: केंद्र आणि विविध राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असते. अशाच एका योजनेअंतर्गत राजस्थान सरकारने शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी कर्ज देण्याची घोषणा केली आहे.

सहकारी ग्राम आवास योजनेंतर्गत राजस्थानमधील शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. एवढेच नाही तर जे शेतकरी गृहकर्जाची वेळेवर परतफेड करतील त्यांना व्याजावर 5 टक्के अनुदानही मिळणार आहे.

सरकारच्या या योजनेची माहिती देताना प्रधान सचिव श्रेया गुहा म्हणाल्या की, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात घरे बांधण्यासाठी केंद्रीय सहकारी बँकांकडून तीन हप्त्यांमध्ये 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज घेतल्यावर 6 टक्के व्याज द्यावे लागणार आहे.

1500 कोटींचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट:

24 एप्रिलपासून राज्यभरात महागाई मदत शिबिरे आयोजित केली जात आहेत. या शिबिरांमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज वाटप करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज्य सरकारने राजस्थान ग्रामीण कुटुंब उपजीविका कर्ज योजनेअंतर्गत सुमारे 1,500 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या अंतर्गत 2,34,000 अर्ज प्राप्त झाले आहेत.

अर्ज कसा करता येईल?

या योजनेअंतर्गत फक्त शेतकरीच अर्ज करण्यास पात्र असतील. शेतकऱ्याकडे स्वतःची शेतीयोग्य जमीन असावी. त्याच वेळी, त्याचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केले पाहिजे.

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जावे लागेल. तेथे तुम्ही बँकेच्या अधिकाऱ्याकडून सहकार ग्राम आवास योजनेअंतर्गत अर्जाबाबत माहिती घेऊ शकता.

15 वर्षांच्या कालावधीत कर्जाची परतफेड करा:

हे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना 15 वर्षांचा कालावधीही दिला जात आहे. यासाठी केंद्रीय सहकारी बँकांच्या व्यवस्थापकीय संचालकांना 72 कोटींहून अधिक रकमेचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. बीपीएल कुटुंबातील लोकांना कायमस्वरूपी रोजगार देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Encounter: छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये देशातील सर्वात मोठी नक्षलवादी चकमक! आतापर्यंत 30 नक्षलवादी ठार; शस्त्रसाठा जप्त

NIAचे महासंचालक ते दहशतवाद्यांचा कर्दनकाळ अशी ओळख; आता हे निवृत्त IPS अधिकारी BCCI मध्ये सांभाळणार मोठी जबाबदारी

Womens T-20 world cup स्पर्धेपूर्वी रोहित शर्माने घेतली भारतीय खेळाडूंची भेट, हरमनप्रीत, स्मृती, जेमिमासोबतचा Video Viral

Prasad Oak : "स्ट्रगलच्या काळात आली रस्त्यावर झोपण्याची वेळ" प्रसादने सांगितला तो कठीण काळ , बायकोचे ट्रोलर्सला खडेबोल

Latest Marathi News Live Updates: राहुल गांधींना पुणे कोर्टाचे समन्स

SCROLL FOR NEXT