Break Up Leave Policy Sakal
Personal Finance

Break Up Leave Policy: ब्रेकअपमधून सावरण्यासाठी मिळणार एक आठवड्याची सुट्टी; 'या' कंपनीने आणली नवी पॉलिसी

Break Up Leave Policy: कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी कंपन्यांमध्ये विविध प्रकारची रजा धोरणे राबविली जातात. यामध्ये तुम्हाला वर्षभरात अनेक प्रकारच्या सुट्ट्या मिळतात. मात्र, काही कारणांमुळे कर्मचाऱ्यांना रजा मागताना संकोच वाटतो आणि ते खोटे बोलून सुटीही घेतात.

राहुल शेळके

Fintech Firm StockGro: कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी कंपन्यांमध्ये विविध प्रकारच्या लिव्ह पॉलिसी राबवल्या जातात. यामध्ये तुम्हाला वर्षभरात अनेक प्रकारच्या सुट्ट्या मिळतात. मात्र, काही कारणांमुळे कर्मचाऱ्यांना रजा मागताना संकोच वाटतो आणि ते खोटे बोलून सुटीही घेतात. पण आता एका भारतीय फिनटेक कंपनीने अनोखी लिव्ह पॉलिसी सुरू केली आहे. ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना ब्रेकअप लिव्ह देत आहे.

स्टॉकग्रो कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ब्रेकअपच्या कठीण काळात पाठिंबा देण्यासाठी ही पॉलिसी सुरू केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ब्रेक अप लिव्ह पॉलिसीमुळे नातेसंबंध तुटल्यानंतर कठीण काळात कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल. (FinTech Firm StockGro Introduces Break-Up Leave Policy For Employees Dealing with Heartbreak)

ही अनोखी पॉलिसी सुरू करताना कंपनीने सांगितले की, आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांची काळजी आहे. त्यांच्या वेदना आम्हाला समजतात. या पॉलिसीच्या माध्यमातून आम्हाला कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे.

स्टॉकग्रोचे संस्थापक अजय लखोटिया म्हणाले की, आता आपले विचार बदलण्याची गरज आहे. आम्ही आमच्या टीमकडे कुटुंबाप्रमाणे पाहतो. ब्रेक अप पॉलिसी ही या प्रयत्नांचा एक भाग आहे. स्टॉकग्रो कर्मचाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य करते. या समस्येच्या काळात त्यांना पुरेसा वेळ मिळावा अशी आमची इच्छा आहे.

कोणताही पुरावा मागितला जाणार नाही

नवीन धोरणानुसार, स्टॉकग्रो कर्मचारी एक आठवड्याची सुट्टी घेऊ शकतात. या संदर्भात कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली जाणार नाहीत. तसेच कोणत्याही प्रकारचे पुरावे मागितले जाणार नाहीत.

कर्मचाऱ्याची इच्छा असल्यास तो मॅनेजमेंटशी बोलून रजा वाढवू शकतो. या रजेमुळे त्यांना मानसिक शांती मिळेल आणि ते परत येऊन चांगले काम करू शकतील, असे कंपनीने मत आहे.

स्टॉकग्रो कंपनी काय करते?

स्टॉकग्रो हे भारतातील एक प्रीमियम फिनटेक स्टार्टअप आहे. कंपनी ट्रेडिंग आणि गुंतवणूकीबद्दल माहिती देते. कंपनीचे 30 दशलक्ष ग्राहक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

Sharad Pawar : पवार, मुंडे यांनी बीडमधील राष्ट्रवादीतील कलह मिटवला, महायुतीच्या क्षीरसागरांना मिळाले समर्थन

Pune Crime News: पाकिटावर लिहिलं ५० हजार रुपये! आतमध्ये निघाली कागदं; पुण्यात पोलिस असल्याचा बनाव करुन सराफाची फसवणूक

SCROLL FOR NEXT