FIU-India to lift ban on world's largest crypto exchange Binance soon  Sakal
Personal Finance

Cryptocurrency: जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी भारतात येण्याच्या तयारीत; रिझर्व्ह बँक काय निर्णय घेणार?

Cryptocurrency Exchange: जगातील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज Binance ने भारताच्या फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटमध्ये नोंदणी केली आहे. भारतात आपले कामकाज पुन्हा सुरू करण्याचा एक्सचेंजचा मानस आहे.

राहुल शेळके

Cryptocurrency Exchange: जगातील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज Binance ने भारताच्या फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटमध्ये नोंदणी केली आहे. भारतात आपले कामकाज पुन्हा सुरू करण्याचा एक्सचेंजचा मानस आहे. फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटच्या (FIU) वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

डिसेंबरमध्ये Binance एक्स्चेंजला भारतात व्यापार करण्यास बंदी घालण्यात आली होती. स्थानिक कायद्याचे पालन न केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

क्रिप्टो एक्सचेंजेस सारख्या व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता सेवा देणाऱ्या कंपन्यांना भारतात कामकाज सुरू करण्यासाठी FIU मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, देशातील मनी लाँडरिंग विरोधी कायद्यांच्या तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे.

FIU चे संचालक विवेक अग्रवाल यांनी सांगितले की, Binance ने FIU मध्ये नोंदणी केली असली तरी नियमांचे पालन न केल्याबद्दल दंड भरल्यानंतरच ते काम सुरू करु शकतील.

FIU ने डिसेंबर 2023 मध्ये 9 ऑफशोर क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेसना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. स्थानिक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली होती.

अग्रवाल म्हणाले की ऑफशोर क्रिप्टो एक्सचेंज कुकॉइनने FIU मध्ये नोंदणी केली होती आणि 34.5 लाख रुपयांचा दंड भरल्यानंतर पुन्हा ऑपरेशन सुरू केले. कुकॉइनने मार्चमध्ये नोंदणीची घोषणा केली होती.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि वित्तीय स्थायिक मंडळ (FSB) यांनी सप्टेंबर 2023 मध्ये एक पेपर सादर केला. यामध्ये क्रिप्टो करन्सीबाबत विविध देशांच्या मार्गदर्शक तत्त्वांची आणि क्रिप्टो नियमांची ब्लू प्रिंट सादर करण्यात आली होती. हा पेपर गुंतवणूकदारांचे संरक्षण, सायबर सुरक्षा आणि अँटी मनी लाँडरिंग (AML) व्यवस्था आणि दहशतवादाला वित्तपुरवठा रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दलचा होता.

ऑक्टोबर 2023 मध्ये, G20 वित्त मंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर (FMCBG) यांनी क्रिप्टो मालमत्तेवर एक रोडमॅप तयार केला होता, जो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वित्तीय स्थायिक मंडळाने पेपरमध्ये प्रस्तावित केला होता. त्याची अंमलबजावणी वेगाने व समन्वयाने करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास क्रिप्टो चलनावर पूर्णपणे बंदी घालण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. दास यांनी ऑक्टोबरच्या उत्तरार्धात पत्रकारांना सांगितले होते, 'आम्ही क्रिप्टोबाबत आमची भूमिका अगदी स्पष्ट ठेवली आहे आणि अजूनही त्यावर ठाम आहोत. त्याचे धोके IMF-FSB च्या पेपरमध्ये देखील नमूद केले आहेत.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT