FM Nirmala Sitharaman ranked 32 on Forbes' 2023 list of powerful women  Sakal
Personal Finance

Forbes: निर्मला सीतारामन फोर्ब्सच्या यादीत 32व्या स्थानी, जगातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये समावेश

राहुल शेळके

Forbes: फोर्ब्सच्या शक्तिशाली महिलांच्या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा जगातील 100 शक्तिशाली महिलांमध्ये स्थान मिळवले आहे. यावर्षी त्या 32 व्या स्थानावर आहेत. या यादीमध्ये राजकारण, व्यवसाय, वित्त, मीडिया आणि मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे, ज्यामध्ये जगभरातील प्रभावशाली महिलांचा समावेश आहे. फोर्ब्सने 64 वर्षीय निर्मला सीतारामन यांना भारतातील राजकारण आणि धोरणांमधील योगदानासाठी या यादीत स्थान दिले आहे.

निर्मला सीतारामन यांची मे 2019 मध्ये भारताच्या अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. यासोबतच त्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रीही आहेत. सीतारामन यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या म्हणूनही काम केले आहे.

फोर्ब्सवर आपली छाप सोडलेल्या इतर उल्लेखनीय भारतीय महिलांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील रोशनी नाडर 60व्या स्थानावर, 70व्या स्थानावर सेलच्या सोमा मंडल आणि किरण मुझुमदार शॉ यांचे नाव देखील या यादीत समाविष्ट आहे.

फोर्ब्सच्या मते, या वर्षीच्या यादीत युक्रेन आणि गाझा यांसारख्या विवादित भागात मुलींचा शिक्षणात प्रवेश, त्यांचे हक्क, सुरक्षा आणि आरोग्य संरक्षण आणि लिंग-आधारित हिंसाचार आणि हवामान धोरणासाठी सुरू असलेली जागतिक लढाई यावर भर देण्यात आला आहे.

युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन यांनी 2023 मध्ये या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. दुसऱ्या क्रमांकावर युरोपियन सेंट्रल बँकेच्या अध्यक्षा क्रिस्टीन लगार्डे आहेत.

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस या तिसर्‍या क्रमांकावर असून त्या खालोखाल इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आहेत. या यादीत टेलर स्विफ्ट यांनी पाचवे स्थान पटकावले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोघांना विजेचा झटका; एकाचा मृत्यू, वडगाव शेरीतील घटना

IND vs BAN 1st Test: भारताने चौथ्याच दिवशी बांगलादेशला केलं पराभूत! शतक अन् ५ विकेट्स घेणारा अश्विन विजयाचा शिल्पकार

Raj Thackeray: "पाकिस्तानी कलाकारांना नाचवणं..."; फवाद खानचा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, राज ठाकरेंचा इशारा

MBBS and BDS : एमबीबीएस, बीडीएसची दुसरी फेरी शुक्रवारपासून; पहिल्‍या फेरीनंतर अवघ्या काही जागा रिक्‍त

भयंकर अपघातातून वाचला अन् मेहनतीने केले पुनरागमन; Rishabh pant बद्दल काय म्हणाला Shubman Gill ?

SCROLL FOR NEXT