Forbes Richest List 2024: भारतात यावर्षी 25 नवीन अब्जाधीशांचा उदय झाला असून, गेल्या वर्षीच्या 169 च्या तुलनेत देशातील एकूण अब्जाधीशांची संख्या 200 वर पोहोचली आहे, नवीन फोर्ब्सच्या अहवालानुसार भारतातील अब्जाधीशांची एकत्रित संपत्ती 954 बिलियन डॉलर आहे, जी गेल्या वर्षी 675 बिलियन डॉलरच्या तुलनेत 41 टक्क्यांनी जास्त आहे.
भारतीयांमध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे मुकेश अंबानी अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत त्यांची एकूण संपत्ती 116 अब्ज डॉलर आहे, त्यानंतर गौतम अदानी (84 बिलियन डॉलर), शिव नाडर (36.9 बिलियन डॉलर), सावित्री जिंदाल आणि फॅमिली (33.5 बिलियन डॉलर) आणि दिलीप सांघवी (26.7 बिलियन डॉलर) आहे.
Forbes Richest List 2024: India Adds 25 New Billionaires, Mukesh Ambani Tops In India, Gautam Adani At 2
जगातील अब्जाधीशांच्या टॉप-10 यादीत मुकेश अंबानी हे एकमेव भारतीय आहेत, ते जागतिक स्तरावर 9व्या क्रमांकावर आहेत. अहवालानुसार सर्वात जास्त 200 अब्जाधीश असलेला भारत हा तिसऱ्या क्रमांकावरचा देश आहे.
बर्नार्ड अर्नॉल्ट आणि कुटुंबाची एकूण संपत्ती 233 बिलियन डॉलर, त्यानंतर एलोन मस्क (195 बिलियन डॉलर), जेफ बेझोस (194 बिलियन डॉलर), मार्क झुकेरबर्ग (177 बिलियन डॉलर), लॅरी एलिसन (141 बिलियन डॉलर), वॉरेन बफेट (133 बिलियन डॉलर), बिल गेट्स (128 बिलियन डॉलर), स्टीव्ह बाल्मर (121 बिलियन डॉलर), मुकेश अंबानी (116 बिलियन डॉलर), आणि लॅरी पेज (114 बिलियन डॉलर).
मुकेश अंबानी - नेटवर्थ 116 बिलियन डॉलर - जगात 9व्या क्रमांकावर आहे
गौतम अदानी - नेटवर्थ 84 बिलियन डॉलर - जगात 17 व्या क्रमांकावर आहे
शिव नाडर - नेटवर्थ 36.9 बिलियन डॉलर - जगात 39 वा क्रमांक
सावित्री जिंदाल आणि कुटुंब - नेटवर्थ 33.5 बिलियन डॉलर - जगात 46 वा क्रमांक
दिलीप सांघवी - नेटवर्थ 26.7 बिलियन डॉलर - जगात 69 वा क्रमांक
सायरस पूनावाला - नेटवर्थ 21.3 बिलियन डॉलर - जगात 90 वा क्रमांक
कुशल पाल सिंग - नेटवर्थ 20.9 बिलियन डॉलर - जगात 92 वा क्रमांक
कुमार मंगलम बिर्ला - नेटवर्थ 19.7 बिलियन डॉलर - जगात 98 व्या क्रमांकावर आहे
राधाकिशन दमाणी – नेटवर्थ 17.6 बिलियन डॉलर – जगात 107 वा क्रमांक
लक्ष्मी मित्तल – नेटवर्थ 16.4 बिलियन डॉलर – जगात 113 वा क्रमांक
रवी जयपुरिया - नेटवर्थ 16.2 बिलियन डॉलर - जगात 115 वा क्रमांक
उदय कोटक - नेटवर्थ 13.3 बिलियन डॉलर - जगात 148 वा क्रमांक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.