Who is Nikesh Arora Sakal
Personal Finance

Nikesh Arora: सीईओ निकेश अरोरा यांनी केला नवा विक्रम, जगातील अब्जाधीशांच्या यादीत झाला समावेश

Nikesh Arora: भारतीय वंशाचे सीईओ निकेश अरोरा यांनी एक नवीन रेकॉर्ड केला आहे. गुगलपासून सॉफ्टबँकपर्यंत अनेक विक्रम करणाऱ्या अरोरा आता 2024 मधील पहिले अब्जाधीश बनले आहेत. निकेश अरोरा यांनी अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले आहे.

राहुल शेळके

Nikesh Arora: भारतीय वंशाचे सीईओ निकेश अरोरा यांनी एक नवीन रेकॉर्ड केला आहे. गुगलपासून सॉफ्टबँकपर्यंत अनेक विक्रम करणारे अरोरा आता 2024 मधील पहिले अब्जाधीश बनले आहेत.

निकेश अरोरा यांनी अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. सध्या ते पाओ अल्टो नेटवर्क्स या सायबर सुरक्षा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, निकेश अरोरा यांना पाओ अल्टो नेटवर्क्सचे सीईओ म्हणून मोठा पगार मिळतो. निकेश अरोरा यांची सध्याची संपत्ती दीड अब्ज डॉलर्स आहे.

कोण आहेत निकेश अरोरा?

55 वर्षीय निकेश अरोरा हे गाझियाबाद यूपीचे आहेत. त्यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1968 रोजी झाला. वडील हवाई दलात अधिकारी पदावर होते. निकेश यांनी सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील एअर फोर्स स्कूलमधून घेतले. 1989 मध्ये त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठा BHU IIT मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये B.Tech चे शिक्षण घेतले.

ग्रॅज्युएशननंतर त्यांनी विप्रोमध्ये नोकरी करून करिअरला सुरुवात केली. मात्र, काही काळानंतर ते नोकरी सोडून पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. त्यांनी नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटी, बोस्टन, यूएसए येथून एमबीए केले आणि 1992 मध्ये फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट कंपनीत प्रवेश केला.

निकेश अमेरिकेत शिकत असताना स्वत:चा खर्च भागवण्यासाठी नोकरी करत असे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, अमेरिकेत शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी बर्गरच्या दुकानात सेल्समन आणि सुरक्षा रक्षक म्हणूनही काम केले होते.

निकेश अरोरा यांनी गुगल, एअरटेलमध्ये काम केले

निकेश अरोरा यांनी जगातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. गुगल, सॉफ्टबँकमध्ये ते मोठ्या पदावर होते. याशिवाय त्यांनी विप्रो, भारती एअरटेल, टी-मोबाइल आणि ड्यूश टेलिकॉममध्येही काम केले.

निकेश अरोरा यांचा पालो अल्टो नेटवर्कमध्ये प्रवेश

निकेश अरोरा यांच्या नेतृत्वाखाली पालो अल्टोने नवीन उंची गाठली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचे मार्केट कॅप सातत्याने वाढत आहे. अरोरा यांनी कोविड-19 साथीच्या काळात पालो अल्टोची कमान हाती घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT