Former RBI Governor D Subbarao criticizes modi government on Revdi culture  Sakal
Personal Finance

D Subbarao: पंतप्रधान बोलतात एक अन् करतात एक; रेवडी संस्कृतीवरून RBIच्या माजी गव्हर्नरांचे सरकारवर टीकास्त्र

Former RBI Governor Subbarao: रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि माजी वित्त सचिव डी. सुब्बाराव यांच्या आठवणींचे पुस्तक ''जस्ट अ मर्सिनरी' नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर' नुकतेच प्रकाशित झाले आहे.

राहुल शेळके

Former RBI Governor Subbarao: रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि माजी वित्त सचिव डी. सुब्बाराव यांच्या आठवणींचे पुस्तक ''जस्ट अ मर्सिनरी' नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर' नुकतेच प्रकाशित झाले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी आर्थिक समस्या, मोफत कर्जमाफी आणि रेवडी संस्कृती यासह विविध विषयांवर भाष्य केले आहे.

'रेवडी' संस्कृतीवर बोलताना डी. सुब्बाराव म्हणाले की, 'रेवडी' संस्कृतीवर पंतप्रधानांची टिप्पणी स्वागतार्ह आहे असे मला वाटले. पण पंतप्रधानांनी त्याची अंमलबजावणी न केल्याने माझी निराशा झाली. यासाठी भाजपसह सर्वच राजकीय पक्ष दोषी आहेत.

काही इतरांपेक्षा अधिक दोषी आहेत. भाजपने 2017 मध्ये उत्तर प्रदेशात शेती कर्ज माफ केले. आता मोदींची गॅरंटी, काँग्रेसची 'न्याय' योजना समोर आहे. माझ्या राज्यात (आंध्र प्रदेशात) मोफत 'रेवाडी' संस्कृतीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात स्पर्धा आहे.

देशावरील वाढते कर्ज या बद्दल बोलताना सुब्बाराव म्हणाले की, मला वाटते की केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्जाचा एकत्रित आढावा घेतला तर कर्जाची पातळी सध्या वाढली आहे. कोविड दरम्यान ते 90 टक्क्यांपर्यंत पोहोचले होते आणि आता ते काहीसे कमी झाले आहे.

पण फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट (FRBM) समिती म्हणते की, भारतातील कर-जीडीपीचे प्रमाण 60 टक्क्यांपर्यंत असावे. केंद्रासाठी 40 टक्के आणि राज्यांसाठी 20 टक्के. यापासून आपण दूर आहोत.

महत्त्वाच्या मंत्रालयांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना खरोखरच काळजी वाटते का की त्यांच्या कोणत्याही निर्णयामुळे महसूल बुडाला तर सीबीआय किंवा ईडी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करू शकेल?

यावर बोलताना रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर म्हणाले की, मी सध्याच्या नोकरशाहीच्या चिंतेवर भाष्य करू शकत नाही परंतु मी त्यांना समजू शकतो. मी 35 वर्षे IAS अधिकारी होतो. जनहिताचे घेतलेले निर्णय त्यांना नंतर महागात पडू शकतात, याची चिंता अधिकाऱ्यांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT