Raghuram Rajan Update Sakal
Personal Finance

Raghuram Rajan: गुंतवणूकदारांनो सावधान! रघुराम राजन यांचा गुंतवणुकीचा सल्ला देणारा व्हिडिओ व्हायरल; होऊ शकते लाखोंचे नुकसान

राहुल शेळके

Raghuram Rajan Update: रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा गुंतवणुकीचा सल्ला देणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशिष्ट शेअर्स आणि गुंतवणुकीबाबत सल्ला देणाऱ्या या बनावट व्हिडिओंकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन राजन यांनी गुंतवणूकदारांना केले आहे. रघुराम राजन म्हणाले की, त्यांनी कधीही नागरिकांना गुंतवणुकीचा सल्ला दिला नाही किंवा त्यांनी कधीही कोणत्याही स्टॉकची जाहिरात केली नाही.

रघुराम राजन यांनी लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे की, मला माहिती आहे की माझ्यावर काही शेअर्समधील गुंतवणुकीच्या सल्ल्याबाबतचा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे जो पूर्णपणे खोटा आहे. मी कधीही कोणत्याही स्टॉकची जाहिरात केली नाही.

Raghuram Rajan Update

राजन म्हणाले, प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या आर्थिक गरजा आणि जोखीम घेण्याची क्षमता असते. ते म्हणाले की म्युच्युअल फंड आणि ईटीएफद्वारे बँक ठेवी, रोखे आणि स्टॉक यासारखे वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ असलेले गुंतवणूकदार विशिष्ट स्टॉक किंवा स्टॉक पर्यायांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांपेक्षा चांगले आहेत. ज्या व्हिडीओमध्ये ते एका विशिष्ट स्टॉकची जाहिरात करताना दाखवण्यात आले आहेत, त्याकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.

रघुराम राजन यांनी 24 जून 2024 रोजी लिंक्डइनवर ही पोस्ट लिहिली आहे. या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंटही केल्या आहेत. शंकरन रघुनाथन या युजरने लिहिले की, मीही हा व्हिडिओ पाहिला आणि मला समजले की तो बनावट आहे.

रघुराम राजन हे रिझर्व्ह बँकेचे 23 वे गव्हर्नर राहिले आहेत आणि सध्या ते शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेस विद्यापीठात प्राध्यापक आहेत. राजन यांनी पुन्हा एकदा सांगितले की ते सार्वजनिक ठिकाणी गुंतवणुकीचा सल्ला देत नाहीत. तसेच, त्यांच्याकडून कोणत्याही विशिष्ट स्टॉकबाबत कोणताही सल्ला दिला जात नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Suraj Chavan Winning Amount: सुरज ठरला 'BB Marathi 5'चा विजेता; बक्षीस म्हणून मिळाली 'इतकी' रक्कम; आणखी काय काय मिळणार?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

IND vs PAK: भारताला धक्का! पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला, पण कर्णधार हरमनप्रीतला दुखापत

SCROLL FOR NEXT