SBI Alert Sakal
Personal Finance

SBI Alert: 'या मेसेजपासून सावधान'! एसबीआयचा करोडो ग्राहकांना अलर्ट, होऊ शकत मोठं नुकसान

राहुल शेळके

SBI Alert: तुमचेही स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एसबीआयच्या करोडो खातेदारांसाठी सरकारने अलर्ट जारी केला आहे. सरकारने एसबीआयच्या करोडो खातेधारकांना फसव्या मेसेज पासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

आजकाल फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. एसबीआयमधील लोकांची खाती हॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एसबीआयच्या ग्राहकांना मेसेज पाठवून त्यांच्या खात्यातून पैसे काढले जात आहेत. याबाबत सरकारने इशारा दिला आहे.

या मेसेज पासून दूर राहा

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBIचे ग्राहक फसवणुकीचा सामना करत आहेत. याबाबत सरकारने एक सूचना जारी केली आहे. एसबीआयच्या नावाने आलेला कोणताही फेक मेसेज बाबत सावधगिरी बाळगा, असे सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली एसबीआय खातेधारकांची फसवणूक होत आहे. लोकांना ईमेल आणि मेसेजद्वारे रिवॉर्ड पॉइंटचे आमिष दाखवून तसेच सोशल मीडियावर फिरणाऱ्या फसव्या मेसेजद्वारे सायबर फसवणूक करून पैसे उकळण्याचा कट सुरू आहे.

SBI असे मेसेज पाठवत नाही

अनेक दिवसांपासून एक मेसेज फिरत आहे, ज्यामध्ये एसबीआय नेट बँकिंग रिवॉर्ड पॉइंट 9980 रुपयांमध्ये दिला जाईल असे लिहिले आहे.

या मेसेजमध्ये ग्राहकांना रिवॉर्ड पॉइंट मिळवण्यसाठी APK फाइल अपलोड करण्यास सांगितले जात आहे. असे मेसेज सोशल मीडियाद्वारे लोकांना पाठवले जात आहेत. याप्रकरणी बँकेने प्रतिक्रिया दिली आहे. पीआयबीने फॅक्ट चेक करुन हा मेसेज खोटा आणि फसवा असल्याचे सांगितले आहे.

एसबीआयने असेही म्हटले आहे की असे मेसेज चुकीचे आहेत आणि एसबीआय कधीही आपल्या ग्राहकांना एसएमएस किंवा व्हॉट्सॲपद्वारे कोणतीही लिंक पाठवत नाही. लोकांना बँक आणि सरकारकडून एपीके फाइल डाउनलोड न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लोकांना अत्यंत सतर्क आणि सावध राहण्यास सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जम्मू-काश्मीरमध्ये बस खोल दरीत कोसळली; 4 जवान ठार, २८ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT