From HDFC Bank credit cards to gas cylinders, these 7 rules will change from 1 December 2023  Sakal
Personal Finance

New Rules From December: HDFC बँक क्रेडिट कार्डपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत, 1 डिसेंबरपासून बदलणार 'हे' 7 नियम

New Rules From 1st December 2023: डिसेंबर महिन्यात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत.

राहुल शेळके

New Rules From 1st December 2023: डिसेंबर महिन्यात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. ज्यामध्ये सिम कार्डच्या नियमांपासून ते एलपीजीच्या किंमती आणि एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांपर्यंत बदल होऊ शकतात.

एचडीएफसी बँक कार्डवरील नियम

HDFC बँकेने आपल्या Regalia क्रेडिट कार्डचे काही नियम बदलले आहेत. हे नियम कार्डच्या लाउंज वापराबाबत आहेत. आता कोणतेही Regalia क्रेडिट कार्ड केवळ खर्चाच्या आधारावर लाउंजमध्ये प्रवेश करू शकणार आहे.

त्यासाठी क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना तिमाहीत (जानेवारी-मार्च, एप्रिल-जून, जुलै-सप्टेंबर, ऑक्टोबर-डिसेंबर) 1 लाख रुपये किंवा त्याहून अधिक खर्च करावे लागतील. म्हणजेच एका तिमाहीत 1 लाख रुपयांचे व्यवहार करूनच लाउंजचा वापर करता येईल.

सिम कार्डसाठी नवीन नियम

केंद्र सरकारने सिमकार्ड खरेदी-विक्रीचे नियम बदलले आहेत. हे नवीन नियम 1 डिसेंबर 2023 पासून संपूर्ण देशात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नवीन नियमांच्या अंमलबजावणीनंतर, एका आयडीवर मर्यादित सिम खरेदी करता येणार आहेत. नवीन नियमांनुसार, सिम कार्ड विक्रेत्यांना नोंदणी करण्यापूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

निष्क्रिय UPI आयडी बंद होतील

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पेमेंट अॅप्सना एक वर्षापेक्षा जास्त काळ सक्रिय नसलेले UPI आयडी आणि नंबर निष्क्रिय करण्यास सांगितले आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर यांना हे काम 31 डिसेंबरपर्यंत करावे लागेल.

जीवन प्रमाणपत्र न दिल्याने पेन्शन बंद

केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी नोव्हेंबर अखेरीस त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. असे न केल्यास पुढील पेन्शन येणे बंद होईल. यासाठी 80 वर्षांवरील व्यक्तींना 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर आणि 60 वर्षांवरील आणि 80 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर अशी वेळ देण्यात आली आहे.

बँक लॉकर

RBI ने सुधारित लॉकर कराराची पद्धतशीरपणे अंमलबजावणी करण्यासाठी 31 डिसेंबर 2023 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. ज्यांनी 31 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी बदललेला बँक लॉकर करारनामा सादर केला आहे त्यांनी पुन्हा एकदा लॉकर करारावर स्वाक्षरी करून सबमिट करणे आवश्यक आहे.

डिमॅट खातेधारकांसाठी महत्त्वाचे

नामनिर्देशनपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पेपर शेअर्स धारण करणाऱ्यांसाठी, सेबीने आधी सांगितले होते की जर पॅन, नामांकन, संपर्क पत्ता, बँक खाते तपशील आणि नमुना स्वाक्षरी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सबमिट न केल्यास फोलिओ गोठवले जातील.

एलपीजी किंमत

प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी एलपीजी सिलिंडर, सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती बदलू शकतात. या काळात मागणी वाढल्याने लग्नाच्या मोसमात व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy 2024-25: शम्स मुलानीच्या ६ विकेट्स! मुंबईकडे ३१७ धावांची आघाडी, ओडिसाला दिला फॉलो ऑन

Narendra Modi: लोकसभेचा धसका? तब्बल 49 मिनिटे भाषण, फक्त काँग्रेस, काँग्रेस अन् काँग्रेस! महायुतीसाठी पंतप्रधान अॅक्शन मोडमध्ये

Narendra Modi in Dhule: ''त्या दिवशी मी गप्प बसलो पण...'' मोदी लवकरच पूर्ण करणार फडणवीसांची 'ती' इच्छा, पंतप्रधानांचा धुळ्यात शब्द

Latest Maharashtra News Updates : जुन्नर पोलिसांनी साडेतीन लाखाच्या ३५ मोबाईलचा घेतला शोध

Solapur Assembly Election : तुतारी ते ट्रम्पेट : बार्शी वगळता 'या' 10 मतदारसंघात 'ट्रम्पेट'; कोणाची चालणार जादू?

SCROLL FOR NEXT