Financial Rule Change Sakal
Personal Finance

Financial Rule Change: गॅसपासून ते क्रेडिट कार्डपर्यंत, आजपासून होणार 'हे' 8 मोठे बदल; जाणून घ्या तुमच्या खिशावर किती परिणाम होईल?

महिना सुरू होताच सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित 8 बदलही पाहायला मिळाले आहेत.

राहुल शेळके

Finacial Rules From July: जुलै महिना सुरू झाला आहे. महिना सुरू होताच सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित 8 बदलही पाहायला मिळाले आहेत. मग त्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमत असो, की सीएनजी पीएनजीच्या किंमत असो.

अगदी बँकेच्या धोरणांमध्येही अनेक बदल झाले आहेत, ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर दिसून येतो. यानंतर सर्वसामान्यांच्या खिशावर किती परिणाम होणार आहे, हे जाणून घ्या.

क्रेडिट कार्डवर 20% TCS

परदेशातील क्रेडिट कार्डचा खर्च TCS च्या कक्षेत आणण्याचा नवा नियम आजपासून लागू झाला आहे. याचा अर्थ असा की 7 लाखांपेक्षा जास्त खर्चावर 20% पर्यंत TCS शुल्क आकारले जाईल.

म्हणजेच परदेशात क्रेडिट कार्डवर 7 लाख किंवा त्यापेक्षा कमी खर्च केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आणि त्यापेक्षा जास्त खर्च केल्यास प्रत्येक व्यवहारावर 20 टक्के शुल्क आकारले जाईल.

HDFC बँक आणि HDFC चे विलीनीकरण

HDFC बँक आणि HDFC चे विलीनीकरण 1 जुलै 2023 पासून म्हणजेच आजपासून होणार आहे. एचडीएफसी समूहाचे अध्यक्ष दीपक पारीख यांनी जाहीर केल्याप्रमाणे एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या दोन्ही वित्तीय कंपन्या, त्यांचे भागधारक, ग्राहक आणि एकूण अर्थव्यवस्थेवर त्याचा सकारात्मक परिणाम अधोरेखित केला आहे.

RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँड्स

सध्या मुदत ठेव अर्थात एफडीला जास्त महत्त्व दिले जात आहे. सर्व बँका यावर ग्राहकांना चांगले व्याज देत आहेत. 1 जुलै 2023 पासून म्हणजेच आजपासून, RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँड्सवर अधिक व्याज देणार आहे.

सध्या 7.35 टक्के दराने व्याज दिले जात असून ते 1 जुलैपासून 8.05 टक्के केले जाऊ शकते. हे दर 6 महिन्यांनी बदलत राहतात.

गुणवत्ता नियंत्रण ऑर्डर

1 जुलै 2023 पासून देशभरात निकृष्ट दर्जाच्या पादत्राणांचे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने देशभरात गुणवत्ता नियंत्रण आदेश लागू करण्याची घोषणा केली आहे, जी 1 जुलैपासून म्हणजेच आजपासून लागू करण्यात आली आहे. यानंतर, सर्व फुटवेअर कंपन्यांनी गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे नियम पाळणे आवश्यक असेल.

गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल झालेला नाही

महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल दिसून येतो. यावेळी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

तर जून महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 83.5 रुपयांनी कमी झाली होती आणि त्याआधी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक सिलिंडरची किंमत 172 रुपयांनी कमी झाली होती. मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कोणताही बदल नाही

IGL च्या वेबसाईटनुसार CNG आणि PNG च्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती एप्रिलमध्येच लागू राहतील.

आकडेवारीनुसार, एप्रिल 2023 मध्ये दिल्लीत सीएनजीची किंमत 73.59 रुपये होती, जी अजूनही तशीच आहे. दुसरीकडे, पाइप नैसर्गिक वायूची किंमत 48.59 प्रति CSM आहे, ज्यामध्ये शेवटचा बदल 9 एप्रिल रोजी दिसून आला.

ITR दाखल करण्याची अंतिम मुदत

प्रत्येक करदात्याने त्याचे इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणे आवश्यक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जुलैमध्ये जवळ येत आहे. तुम्ही अजून तुमचा ITR भरला नसेल तर 31 जुलैपर्यंत पूर्ण करा.

पॅन-आधार कार्ड लिंक

जर कोणी 30 जूनपर्यंत त्यांचा पॅन आधारशी लिंक केला नसेल तर 1 जुलैपासून त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. याचा अर्थ तो बँकिंगशी संबंधित कोणतेही काम करू शकणार नाही. आगामी काळात त्याच्यासमोर अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT