fy2023-24 assessment year 2024-25 taxpayers who are not required to undergo audit last date for filing Income Tax Return is 31 July 2024 Sakal
Personal Finance

वार्षिक माहितीपत्राची वाढती व्याप्ती

नव्या व्यापक ‘एआयएस’मुळे प्राप्तिकर विभाग आर्थिक माहिती हाताळण्यात अधिक सक्षम होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

- अॅड. सुकृत देव

आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी (आकारणी वर्ष २०२४-२५) ज्या करदात्यांना लेखापरीक्षण करून घेण्याची गरज नाही, त्यांच्यासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे.

विवरणपत्र दाखल करण्यापूर्वी वार्षिक माहितीपत्र (एआयएस), ‘टीआयएस’ आणि ‘फॉर्म २६ एएस’ करविभागाच्या संकेतस्थळावर (https://www.incometax.gov.in/iec/foportal/) लॉग-इन करून नीट तपासून घेणे आवश्यक आहे. करदात्यांच्या सोयीसाठी प्राप्तिकर विभागाने वार्षिक माहितीपत्रामध्ये (एआयएस) सुधारणा केल्या आहेत.

या नव्या वार्षिक माहितीपत्रात (एआयएस) प्रत्येक प्राप्तिकरदात्याच्या अद्ययावत आर्थिक माहितीची नोंद (विविध माहिती स्रोतांकडून प्राप्त) केली जाणार आहे, यामुळे वार्षिक माहितीपत्राची व्याप्ती वाढणार आहे. त्यामुळे करदात्यांनी त्यातील माहितीकडे बारकाईने लक्ष देणे आवश्‍यक आहे. या नव्या व्यापक ‘एआयएस’मुळे प्राप्तिकर विभाग आर्थिक माहिती हाताळण्यात अधिक सक्षम होणार आहे.

महत्त्वाचे बदल

  • वार्षिक माहितीपत्राच्या वाढत्या व्याप्तीमुळे पारदर्शकता वाढली आहे. करदात्याच्या लहानसहान व्यवहारांची माहिती जमा करण्यातदेखील याचा महत्त्वाचा वाटा आहे.

  • करदात्याला संपूर्ण वर्षातील आर्थिक व्यवहारांची माहिती, सर्वसमावेशक पुनरावलोकन (comprehensive review) स्वरूपात मिळत आहे.

  • वार्षिक माहितीपत्रामध्ये आर्थिक व्यवहारांबरोबरच पगाराचा तपशील, व्याज, लाभांश, व्यावसायिक जमा पावत्या, शेअर व्यवहारातील लाभांश, म्युच्युअल फंड व्यवहार, सिक्युरिटीज व्यवहार, मालमत्ता व्यवहार, परदेशी व्यवहार, क्रेडिट कार्ड व्यवहार यासह ‘टीडीएस’, ‘टीसीएस’, संपूर्ण वर्षभरात भरलेला प्राप्तिकर, रिफंड मागणी याचा सविस्तर तपशील दिसतो.

  • करदात्याने सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती विवरणपत्रामध्ये दाखवणे आवश्‍यक आहे, तसेच वार्षिक माहितीपत्र, ‘टीआयएसॅ, ‘फॉर्म २६ एएस’ यातील तपशीलाशी सर्व माहिती जुळवून घेणे आवश्यक आहे.

  • सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, आताच्या अद्ययावत (अपडेटेड) वार्षिक माहितीपत्रामध्ये, करदाता ‘एआयएस’मधील सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती बघू शकतो, त्याचबरोबर प्रत्येक व्यवहाराबाबत अभिप्रायही देऊ शकतो, ज्यामुळे बदल करणे सुलभ झाले आहे. यामुळे प्राप्तिकरातील पारदर्शकता वाढेल, वादविवाद कमी होतील, अशी अपेक्षा आहे.

  • ‘एआयएस’मधील माहितीवर अभिप्राय देणे ही करदात्याची एक मुख्य जबाबदारी असणार आहे. कारण अभिप्राय न दिल्यास तुम्हाला हे मान्य आहे, असे मानले जाऊ शकते. त्यांच्यासाठी उत्तरांचे खालील पर्याय उपलब्ध आहेत.

  • माहिती बरोबर आहे.

  • उत्पन्न करमुक्त आहे.

  • माहिती अर्धवट बरोबर आहे.

  • माहिती दुसऱ्या पॅन नंबरची किंवा वर्षाची आहे.

  • माहिती आधीच्या माहितीची नक्कल आहे किंवा ही माहिती आधीच दुसऱ्या माहितीमध्ये समाविष्ट केलेली आहे.

  • माहिती बरोबर नाही.

विवरणपत्र १५ जूननंतर भरणे सोयीचे

आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी (आकारणी वर्ष २०२४-२५) अद्ययावत ‘एआयएस’, ‘टीआयएस’, ‘फॉर्म २६ एएस’ साधारण १५ जूनच्या आसपास किंवा त्यानंतर उपलब्ध होणार असल्याने, विवरणपत्र त्यानंतर दाखल करणे अधिक सोयीचे ठरेल. करदात्यांनी विवरणपत्र दाखल करण्याआधी, ‘टीडीएस’, ‘टीसीएस’ किती कापला आहे, वर्षभरात किती कर भरला आहे,

मालमत्तेचे कोणते व्यवहार केले आहेत याची एक चेकलिस्ट तयार केल्यास ते माहितीची पडताळणी सहजपणे करू शकतील. त्यामुळे त्याचे संपूर्ण उत्पन्न, आर्थिक व्यवहार, परतावा आदीबाबत अंदाज बांधता येईल आणि अचूक प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT