Gang says ICBC paid ransom over hack that disrupted US Treasury market  Sakal
Personal Finance

ICBC Bank: यूएस ट्रेझरी मार्केट हॅक करणाऱ्या हॅकर्सला चीनच्या बँकेने दिली खंडणी? काय आहे प्रकरण

ICBC Bank: सायबर तज्ज्ञांनी हॅकर्सचा तपास सुरू केला आहे.

राहुल शेळके

ICBC Bank: चीनच्या इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना म्हणजेच ICBC मध्ये हॅकर्सनी प्रवेश केला होता. चीनच्या या सर्वात मोठ्या बँकेवर रॅन्समवेअरने हल्ला केला होता. यामुळे, न्यूयॉर्कमध्ये असलेल्या बँकेच्या अमेरिकन युनिटवर परिणाम झाला. याचा परिणाम अमेरिकेच्या ट्रेझरी विभागावरही झाला.

सायबर तज्ज्ञांनी हॅकर्सचा तपास सुरू केला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यासाठी रशियन भाषिक रॅन्समवेअर सिंडिकेटला जबाबदार धरले जात आहे.

लॉकबिट हा तोच गट आहे ज्याने अलीकडेच बोइंग पार्ट्स आणि वितरण करणाऱ्या कंपनीवर रॅन्समवेअर हल्ला केला होता. याआधी याच लॉकबिटला ब्रिटनच्या रॉयल मेल आणि जपानच्या सर्वात मोठ्या सागरी बंदरावर झालेल्या सायबर हल्ल्यासाठीही जबाबदार धरण्यात आले होते.

शुक्रवारी जेव्हा ICBC वर झालेल्या सायबर हल्ल्याची माहिती समोर आली तेव्हा लोकांना धक्काच बसला. यूएस सिक्युरिटीज इंडस्ट्री अँड फायनान्शियल मार्केट्स असोसिएशन (सिफ्मा) ने आपल्या सदस्यांना या हल्ल्याची माहिती दिली.

चीनच्या इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना म्हणजेच ICBC बँकेने खंडणी दिली आणि त्यानंतर सौदा बंद झाला अशी माहिती लॉकबिट प्रतिनिधीने टॉक्स या ऑनलाइन मेसेजिंग अॅपद्वारे रॉयटर्सला दिली आहे.

लॉकबिट काय आहे ते कसे काम करते?

लॉकबिट हा एक सायबर गुन्हेगारी गट आहे जो मोठ्या कंपन्या, गट, बँकांना लक्ष्य करतो आणि वापरकर्त्यांच्या डेटामधून मोठ्या प्रमाणात पैसे उकळतो. जेव्हा त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत तेव्हा ते लोकांचा डेटा लीक करतात. अनेक प्रकरणांमध्ये ते संबंधित कंपनी किंवा बँकेचे संगणक लॉक करतात आणि ते अनलॉक करण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी करतात.

ही वसुली रक्कम बिटकॉइनमध्ये वसूल केली जाते. Times of Indiaच्या अहवालानुसार, हॅकर्सचा हा गट 2019 पासून सक्रिय आहे, तेव्हापासून त्याने हजारो संस्थांवर हल्ले केले आहेत. सायबर सिक्युरिटी फर्म कॅस्परस्कीच्या म्हणण्यानुसार, टोळीचे सदस्य केवळ रशियातच नाही तर युरोप-अमेरिका, इंडोनेशिया, भारत आणि चीनसह जगाच्या प्रत्येक भागात पसरले आहेत.

ICBC ही सर्वात मोठी कर्ज देणारी बँक

इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना ही जगातील सर्वात मोठी कर्ज देणारी बँक आहे. या हल्ल्यामुळे प्रभावित झालेल्या बँकेच्या अमेरिकन युनिटची 2022 च्या अखेरीस 23.5 अब्ज डॉलरची मालमत्ता होती.

आता रॅन्समवेअर केलेल्या हल्ल्यामुळे बँकांच्या सुरक्षेला पुन्हा एकदा धोका निर्माण झाला आहे. आयसीबीसीने आपली सायबर सुरक्षा सुधारत असल्याचे सांगितले असले तरी या हल्ल्याने तो दावा पुन्हा एकदा उघडकीस आणला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT