Billionaires List Sakal
Personal Finance

Billionaires List: अदानी आणि पुतिनसाठी खुशखबर! अब्जाधीशांच्या यादीत मिळाले स्थान, अंबानींची स्थिती काय?

Billionaires List: इलॉन मस्कचे वर्चस्व कायम

राहुल शेळके

Billionaires List: जगातील अब्जाधीशांमध्ये सर्वाधिक नुकसान झालेले भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अमेरिकन शॉर्ट सेल फर्म हिंडेनबर्ग अहवालामुळे गौतम अदानींना मोठे नुकसान झाले होते परंतु त्यांनी आता मोठी झेप घेतली आहे.

आता त्यांनी आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्तीचा दर्जा प्राप्त केला आहे. विशेष म्हणजे गौतम अदानी यांच्या नेट वर्थमध्ये घसरण होऊनही ते पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

शुक्रवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची संपत्ती 8.90 दशलक्ष डॉलरने घसरून 63.9 अब्ज डॉलर झाली.

ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, एवढ्या संपत्तीसह ते पुन्हा एकदा अब्जाधीशांच्या यादीत 20 व्या स्थानावर पोहोचले आहेत.

मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

अब्जाधीशांच्या यादीत आशियातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत झोंग शानशानच्या संपत्तीत घसरण झाली आहे आणि याचा थेट फायदा गौतम अदानींना झाला.

विशेष म्हणजे, भारतीय अब्जाधीश आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अंबानींची एकूण संपत्ती 96.4 अब्ज डॉलर्स आहे आणि एवढ्या संपत्तीसह ते जगातील 11 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

इलॉन मस्कचे वर्चस्व कायम

ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांचे अब्जाधीशांच्या यादीत वर्चस्व कायम आहे. मस्क 224 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट यांचे नाव आहे, ज्यांची संपत्ती 191 अब्ज डॉलर आहे, तर जगातील तिस-या क्रमांकावर अॅमेझॉनचे जेफ बेझोस 163 अब्ज डॉलर आहेत.

मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स 130 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत, तर लॅरी एलिसन 127 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहेत.

टॉप-10 श्रीमंतांमध्ये या नावांचा समावेश आहे

जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत अनुभवी गुंतवणूक वॉरेन बफे हे सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती 120 अब्ज डॉलर आहे.

याशिवाय लॅरी पेज 17 अब्ज डॉलर संपत्तीसह सातव्या क्रमांकावर, स्टीव्ह बाल्मर 112 अब्ज डॉलर संपत्तीसह आठव्या स्थानावर, सर्गे ब्रिन 111 अब्ज डॉलर संपत्तीसह नवव्या स्थानावर आणि 110 अब्ज डॉलर संपत्तीसह फेसबुकचे मार्क झकरबर्ग10 व्या क्रमांकावर आहेत.

रशियन राष्ट्राध्यक्षांचा पुन्हा टॉप-50 श्रीमंतांमध्ये समावेश

गौतम अदानी यांनी उद्योगपतींच्या यादीत पुनरागमन केले आहे, तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, जे यापूर्वी टॉप-50 अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर होते, त्यांनी पुन्हा एकदा प्रवेश केला आहे.

ब्लूमबर्गनुसार, व्लादिमीर पुतिन यांच्याकडे 29 अब्ज डॉलरची संपत्ती आहे आणि एवढ्या संपत्तीसह ते आता श्रीमंतांच्या यादीत 49 व्या क्रमांकावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT