Former CEA Arvind Subramanian Sakal
Personal Finance

GDP: जीडीपीच्या आकडेवारीत घोळ? विदेशी गुंतवणूक का वाढत नाही? मोदींच्या माजी आर्थिक सल्लागारांनी सांगितलं कारण

Former CEA Arvind Subramanian: नरेंद्र मोदी सरकारचे माजी आर्थिक सल्लागार असलेले अरविंद सुब्रमण्यम यांनी देशाच्या विकास दराच्या (जीडीपी) आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

राहुल शेळके

Former CEA Arvind Subramanian GDP: नरेंद्र मोदी सरकारचे माजी आर्थिक सल्लागार असलेले अरविंद सुब्रमण्यम यांनी देशाच्या विकास दराच्या (जीडीपी) आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी जीडीपी वाढीच्या नव्या आकडेवारीला 'अस्पष्ट' असे म्हटले आहे.

माजी आर्थिक सल्लागारांनी उदाहरण देऊन सांगितले की, सरकारने 1-1.5 टक्के अशी महागाईची आकडेवारी दिली आहे तर वास्तविक महागाई 3-5 टक्के आहे. अर्थव्यवस्था 7.5% दराने वाढत असताना खाजगी वापर 3% च्या दराने कमी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

अलीकडेच सरकारने जीडीपीचे आकडे सादर केले होते. त्यांच्या मते, 2023-24 आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था 8.4 टक्के दराने वाढली.

याशिवाय, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीचे आकडे 7.8 टक्के आणि 7.6 टक्क्यांवरून 8.2 टक्के आणि 8.1 टक्के करण्यात आले आहेत. म्हणजे सरकारच्या म्हणण्यानुसार देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा वेगाने वाढत आहे.

अरविंद सुब्रमण्यन यांनी थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) कमी होत असल्याचेही अधोरेखित केले. ते म्हणाले की, गेल्या दोन-तीन तिमाहींमध्ये एफडीआयमध्ये झपाट्याने घट झाली आहे.

ते म्हणाले, “भारताचा एफडीआय कमी होत आहे एवढेच नाही तर जगभरातील उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये जाणाऱ्या जागतिक एफडीआयमधील भारताचा वाटाही कमी झाला आहे. मग प्रश्न असा आहे की जर भारत हे गुंतवणुकीसाठी इतके आकर्षक ठिकाण बनले आहे, तर अधिक एफडीआय का येत नाही? आज देशातील कॉर्पोरेट गुंतवणूक 2016 च्या पातळीपेक्षा खूपच खाली आहे."

सुब्रमण्यन यांनी दक्षिण भारतीय राज्यांमध्ये पुन्हा वाढत्या उत्पादन क्षमतेचे कौतुक केले. त्यांनी सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजना आणि आत्मनिर्भर भारत धोरणाचेही कौतुक केले. ते म्हणाले, "कारखाने मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहेत, कामगारांना रोजगार मिळत आहे. याशिवाय जागतिक बाजारपेठेत सेवा निर्यातीतही भारताचा चांगला वाटा आहे."

कोण आहेत अरविंद सुब्रमण्यम?

अरविंद सुब्रमण्यम हे देशातील नामवंत अर्थतज्ञांमध्ये केली जाते. नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ऑक्टोबर 2014 मध्ये त्यांची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सुब्रमण्यम जवळपास 4 वर्षे या पदावर राहिले.

माजी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांनी सुब्रमण्यम यांच्या राजीनाम्याची माहिती सार्वजनिक केली तेव्हा त्यांनी अरविंद सुब्रमण्यन यांना त्यांच्या सरकारच्या GST आणि JAM (Jandhan-Aadhar-Mobile) सारख्या महत्त्वाकांक्षी योजनांचे श्रेय दिले होते.

JAM म्हणजे जन धन, आधार आणि मोबाईल. ज्याद्वारे गरिबांना थेट त्यांच्या खात्यात पैसे मिळण्यास मदत होत असल्याचा सरकारचा दावा आहे.

भारत फार मोठी बाजारपेठ नाही

अरविंद सुब्रमण्यम म्हणाले की, भारत ही मोठी बाजारपेठ आहे या समजातून भारतीयांना बाहेर पडण्याची गरज आहे. ते म्हणाले की आपण फार मोठी बाजारपेठ नाही. यावर सविस्तर माहिती देताना ते म्हणाले की, भारताचा जीडीपी 3,000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे, तर मध्यमवर्गीयांचा बाजारातील हिस्सा अंदाजे 750 अब्ज डॉलर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

Winter Health Tips : हवामानातील बदलामुळे होणाऱ्या सर्दी-खोकल्याला वैतागला आहात, औषधांपेक्षा हे घरगुती उपाय ठरतील फायद्याचे

Healthy Food : मुलांसाठी पोषक आहेत हे लाडू, घरीच बनवा अन् नैसर्गिकरित्या मुलांची उंची वाढवा

Cherry Blossom Festival : चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल पहायला जपान,चीनला कशाला जायचं? भारतात आहेत ही खास ठिकाणं

Latest Maharashtra News Updates live : अभिनेते, आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा महायुतीच्या उमेदवारांसाठी सोलापुरात 'रोड शो'; नागरिकांची मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT