Vodafone Idea sakal
Personal Finance

Vodafone Idea : माहिती सुरक्षिततेबाबत ‘वी’ला जागतिक मान्यता

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडियाने (वी) ‘एसओसी -२ टाईप टू अटेस्टेशन’ ही प्रगत जागतिक मान्यता मिळवली आहे. ही मान्यता मिळवणारी ती देशातील एकमेव दूरसंचार कंपनी आहे.

डेटा सुरक्षितता, ग्राहकांची संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवून डिस्ट्रिब्युटेड डिनायल-ऑफ-सर्व्हिस हल्ले कमी करण्याप्रती कंपनीची वचनबद्धता यामुळे अधोरेखित झाली आहे. नोंदणीकृत स्वतंत्र सीपीए असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल सर्टिफाइड प्रोफेशनल अकाउंटंट्सने केलेल्या काटेकोर मूल्यांकन प्रक्रियेत यशस्वी ठरल्यानंतर दिलेली ही मान्यता ‘एसओसी २ ट्रस्ट सर्व्हिस’वर आधारित आहे.

यासाठी सुरक्षितता, उपलब्धता, प्रक्रियेची अखंडता, गोपनीयता आदी प्रमुख निकषांनुसार मूल्यांकन केले जाते. या अटेस्टेशनमधून कंपनीची महत्त्वपूर्ण सुरक्षा धोरणे अंमलात आणण्याची क्षमता आणि प्रदीर्घ कालावधीत त्याचे अनुपालन केले जात असल्याचे दिसून येते, असे कंपनीने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT