Go First CEO Kaushik Khona resigns amid airline's uncertain future  Sakal
Personal Finance

Go First CEO Resigns: गो फर्स्टचे सीईओ कौशिक खोना यांनी दिला राजीनामा; जाताना कर्मचाऱ्यांना म्हणाले...

Go First CEO Resigns: गो फर्स्ट का बंद पडली?

राहुल शेळके

Go First CEO Resigns: बंद पडलेली एव्हिएशन कंपनी गो फर्स्टचे सीईओ कौशिक खोना यांनी राजीनामा दिला आहे. सुमारे 7 महिन्यांपूर्वी, गो फर्स्टने दिवाळखोरी प्रक्रियेसाठी केस दाखल केली होती. खोना यांनी 30 नोव्हेंबर रोजी एअरलाइन कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये सांगितले की, 30 नोव्हेंबर हा त्यांचा कंपनीतील शेवटचा दिवस होता.

खोना यांनी ई-मेलमध्ये म्हटले आहे की, 'जड अंतःकरणाने मला कळवायचे आहे की आज माझा कंपनीसोबतचा शेवटचा दिवस आहे. मला पुन्हा एकदा ऑगस्ट 2020 मध्ये गो फर्स्टसाठी काम करण्याची संधी मिळाली आणि तुमच्या पाठिंब्याने मी माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला.' यापूर्वी खोना यांनी 2008 ते 2011 या काळात गो फर्स्टमध्ये काम केले होते. .

ते पुढे म्हणाले, 'मला आशा आहे की कंपनी पुन्हा सुरू होईल. किमान सर्व कर्मचाऱ्यांचे प्रलंबित पगार व देणी दिली जातील. मी काम करत राहिलो आणि सर्व कर्मचार्‍यांचे पगार देण्यासाठीच नव्हे तर कंपनी पुन्हा सुरू करण्याचा माझा सर्वतोपरी प्रयत्न केला. पण मला यश आले नाही.

आता याचा माझ्या आरोग्यावर आणि माझ्या कुटुंबाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. म्हणून जड अंतःकरणाने मी निघण्याचा निर्णय घेतला आहे.

गो फर्स्ट का बंद पडली?

गो फर्स्टची उड्डाणे 3 मेपासून बंद आहेत. अमेरिकन कंपनी प्रॅट अँड व्हिटनीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे गो फर्स्टला निम्म्याहून अधिक विमाने बंद करावी लागली. त्यांच्याकडे रोख रकमेची कमतरता होती आणि इंधनासाठीही पैसे नव्हते.

कौशिक खोना यांचा दावा आहे की इंजिनच्या समस्येमुळे 3 वर्षात सुमारे 8.9 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गो फर्स्ट ही वाडिया ग्रुपची एअरलाइन आहे. त्याचे पहिले उड्डाण नोव्हेंबर 2005 मध्ये मुंबई ते अहमदाबाद दरम्यान झाले. ते गो एअर म्हणून ओळखले जात होते. एअरलाइनने 2021 मध्ये त्याचे नाव बदलून गो फर्स्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ही धारणा चुकीची; लगेच नवीन सरकार अस्तित्वात येणे बंधनकारक नाही, यापूर्वी 'इतक्या' वेळा विधानसभेची मुदत संपल्यानंतर शपथविधी

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! ऋषभ पंतवर तब्बल २७ कोटींची बोली

Maharashtra Election Result 2024: विरोधकांचे उरले-सुरले आमदारही सत्तापक्षाच्या संपर्कात; आणखी दोन पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

Rishabh Pant IPL Mega Auction 2025 : ऋषभ पंतला बम्पर लॉटरी! SRH, LSG यांनी जबरदस्त जोर लावला; श्रेयसचा 26.75cr चा विक्रम मोडला

Shreyas Iyer IPL Mega Auction 2025 : श्रेयस अय्यर आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला, PBKS ने मोजली तगडी रक्कम

SCROLL FOR NEXT