Goa-based casino operator Delta Corp receives GST demand of Rs 11,139 crore  Sakal
Personal Finance

डेल्टा कॉर्पला मोठा धक्का! GSTने 11,139 कोटी रुपयांची पाठवली नोटीस, काय आहे कारण?

Delta Corp: भारतातील सर्वात मोठी कॅसिनो चेन डेल्टा कॉर्पने स्टॉक एक्सचेंजला ही माहिती दिली.

राहुल शेळके

Delta Corp: जीएसटी महासंचालनालयाने कॅसिनो ऑपरेटर डेल्टा कॉर्पला 11,139 कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. ही रक्कम कंपनीला व्याज आणि दंडासह परत करायची आहे. नोटीसनुसार, कंपनीने जुलै 2017 ते मार्च 2022 या कालावधीत कमी कर भरला होता.

भारतातील सर्वात मोठी कॅसिनो चेन डेल्टा कॉर्पने 22 सप्टेंबर रोजी स्टॉक एक्सचेंजला सांगितले की त्यांना 11,139 कोटी रुपयांची जीएसटी नोटीस मिळाली आहे.

हैदराबादच्या जीएसटी इंटेलिजन्सच्या महासंचालकांनी ही नोटीस पाठवली आहे. कंपनीने शुक्रवारी स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, कंपनीला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

मिळालेल्या माहितीनुसार ही नोटीस एकतर्फी आणि कायद्याच्या विरोधात असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या कर मागणीला कायदेशीर आव्हान देणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

अलीकडे, जीएसटी कौन्सिलने कॅसिनो, ऑनलाइन गेमिंग आणि हॉर्स रेसिंगवर 28 टक्के कर कायम ठेवला आहे. 1 ऑक्टोबर 2023 पासून कर लागू होण्याची शक्यता आहे आणि अंमलबजावणीच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर कर आकारणीचा आढावा घेण्यासाठी परिषद पुन्हा बैठक घेईल.

दुसरीकडे, गेमिंग कंपन्यांना नवीन 28 टक्के जीएसटी कराचा फटका बसू लागला आहे आणि गेमिंग अॅप मोबाइल प्रीमियर लीगने गेल्या महिन्यात सांगितले की कर टाळण्यासाठी 350 कर्मचार्‍यांना काढून टाकले जाईल. जुलैमध्ये सरकारने नवीन 28 टक्के जीएसटी प्रस्तावित केल्यानंतर डेल्टा कॉर्पचे शेअर्स सुमारे 29 टक्क्यांनी घसरले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk on Trump Victory: ट्रम्प यांच्या विजयावर इलॉन मस्क यांची प्रतिक्रिया; म्हणाले, अपरिहार्य...

Manoj Jarange Patil : ...अन्यथा थेट कार्यक्रम करेन; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

Donald Trump: रिपब्लिकन पक्षाचा नेता अमेरिकेचा राष्ट्रध्यक्ष झाला; आठवलेंनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, भारत...

Mephedrone Case : मेफेड्रोन उत्पादन प्रकरणाचा खटला सुरू; ललित पाटीलसह २२ आरोपींवर गुन्हा दाखल

Video: “कोण आहेत हे, यांचं नाव घेऊन ठेवा”; मविआच्या सभेपूर्वी उद्धव ठाकरे पोलिसांवर भडकले

SCROLL FOR NEXT