Gold demand rises 10 percent in Sept on softer prices  Sakal
Personal Finance

जुलै-सप्टेंबरमध्ये सोन्याच्या मागणीत 10 टक्के वाढ, किंमती कमी झाल्यामुळे ग्राहकांची खरेदी

Gold Demand: भारतात सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी दहा टक्क्यांनी वाढली आहे.

राहुल शेळके

Gold Demand: भारतात सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी दहा टक्क्यांनी वाढली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) च्या मते, चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी 10 टक्क्यांनी वाढून 210.2 टन झाली आहे.

भारतात सोन्याच्या किंमती घसरल्याने आणि सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे.

सर्वाधिक मागणी ग्रामीण भारतातून होती. भारतात एकूण सोन्याच्या वापरापैकी 60 टक्के सोन्याचा वापर ग्रामीण भागात होतो. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) नुसार, 2023 मध्ये भारतात सोन्याचा वापर 700-750 टन असल्याचा अंदाज आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडा कमी झाला आहे.

जागतिक स्तरावरही मागणी वाढली

जागतिक स्तरावर पाहिल्यास, वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचा अहवालात म्हटले आहे की, सोन्याचे आकर्षण अजूनही कायम आहे. मध्यवर्ती बँका देखील मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत आहेत. त्यामुळे या तिमाहीत सोन्याची जागतिक मागणी 1,147 टन झाली आहे.

सोन्याच्या किंमतीतील घसरण आणि सणासुदीच्या मागणीमुळे भारतात सोन्याच्या दागिन्यांची वार्षिक विक्री 7% वाढून 155.7 टन झाली. सोन्याच्या दागिन्यांची विक्री दक्षिण भारतात जास्त होती.

WGC च्या मते, सण आणि लग्नाच्या खरेदीच्या दरम्यान ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत सोन्याची मागणी वाढू शकते, परंतु किंमती वाढल्याने मागणीत घसरणही होऊ शकते.

ऑक्टोबरमध्ये सोने किती महागले?

ऑक्टोबर महिन्यात सोन्याचा भाव 3,300 रुपयांनी वाढला आहे. आकडेवारीनुसार, 29 सप्टेंबर रोजी सोन्याचा भाव 57,600 रुपये प्रति दहा ग्रॅम होता, जो 31 ऑक्टोबर रोजी वाढून 60,940 रुपये झाला आहे.

म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात सोन्याच्या किंमतीत प्रति दहा ग्रॅम 3,340 रुपयांची वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात गुंतवणूकदारांना प्रति दहा ग्रॅम सोन्यामागे 5.80 टक्के परतावा मिळाला. दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 62,500 रुपयांच्या जवळपास पोहोचू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT