Gold imports jump 30 pc to USD 45-54 billion in 2023-24  Sakal
Personal Finance

Gold Import: सोन्याची आयात 2023-24 मध्ये 30 टक्क्यांनी वाढली; कोणता देश सर्वाधिक सोने खरेदी करतो?

राहुल शेळके

Indias Gold Imports: चांगल्या देशांतर्गत मागणीमुळे 2023-24 या आर्थिक वर्षात देशातील सोन्याची आयात 30 टक्क्यांनी वाढून 45.54 अब्ज डॉलर झाली आहे. शुक्रवारी सरकारी आकडेवारीत ही माहिती देण्यात आली. 2022-23 या आर्थिक वर्षात सोन्याची आयात 35 अब्ज डॉलर इतकी होती. वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सोन्याची आयात यावर्षी मार्चमध्ये 53.56 टक्क्यांनी घसरून 1.53 अब्ज डॉलर झाली आहे.

स्वित्झर्लंड हा सोन्याच्या आयातीचा सर्वात मोठा स्त्रोत

स्वित्झर्लंड हा सोन्याच्या आयातीचा सर्वात मोठा स्त्रोत आहे, ज्याचा वाटा सुमारे 40 टक्के आहे. यानंतर आयातीत संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) वाटा 16 टक्के आणि दक्षिण आफ्रिकेचा वाटा सुमारे 10 टक्के आहे. देशाच्या एकूण आयातीत सोन्याचा वाटा पाच टक्क्यांहून अधिक राहिला आहे. सध्या सोन्यावर 15 टक्के आयात शुल्क आहे.

देशाची व्यापारी तूट कमी झाली

सोन्याच्या आयातीत वाढ होऊनही, देशाची व्यापार तूट (आयात आणि निर्यातीमधील फरक) गेल्या आर्थिक वर्षात 240.18 अब्ज डॉलरपर्यंत कमी झाली, तर 2022-23 मध्ये ही व्यापार तूट 265 अब्ज डॉलर होती. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. ही आयात प्रामुख्याने ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करते.

भारतात सोने हा सर्वात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. पण सोन्याच्या आयातीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. सोन्याच्या आयातीतील वाढीमुळे देशाच्या व्यापार तूटवर परिणाम होतो.

सोन्याचे भाव 73,000 रुपयांच्या पुढे गेले आहेत

अलीकडच्या काळात सोन्याच्या भावात झपाट्याने वाढ झाली आहे. तो 73,000 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वर पोहोचला आहे. अमेरिकेतील बेरोजगारीच्या दाव्यांच्या ताज्या आकडेवारीने श्रमिक बाजारात मंदीचे संकेत दिल्यानंतर सोन्याने वेग पकडला आहे. यामुळे यूएस फेडरल रिझर्व्ह या वर्षी व्याजदरात कपात करण्यास सुरुवात करेल असा विश्वास वाढला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT