Gold-Silver Rate Today Sakal
Personal Finance

Gold Rate Today: सोन्याने केला पुन्हा नवा विक्रम, चांदीच्या भावातही वाढ, आज काय आहे भाव?

Gold-Silver Rate Today 8 April 2024: भारतातील सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने नवनवीन विक्रम होत आहेत आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर पहिल्यांदाच सोन्याने 71,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. चांदीच्या वाढीनंतर, भाव 81,000 रुपयांच्या वर दिसत आहेत.

राहुल शेळके

Gold-Silver Rate Today 8 April 2024: भारतातील सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने नवनवीन विक्रम होत आहेत आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर पहिल्यांदाच सोन्याने 71,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. चांदीच्या वाढीनंतर भाव 81,000 रुपयांच्या वर दिसत आहेत.

सोने MCX वर 71,057 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. सोन्यामध्ये आज 400 रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे. चांदीचा भाव 81,000 रुपयांच्या पुढे गेला आहे आणि आता तो 82,000 रुपयांच्या जवळ जात आहे.

अक्षय्य तृतीयेचा सण 10 मे रोजी असून सोन्याच्या भावात प्रचंड वाढ झाल्यामुळे या वेळी सोन्या-चांदीची नाणी किंवा दागिने खरेदी होतील का? याची चिंता व्यापाऱ्यांना आहे. खरं तर, अक्षय्य तृतीयेचा सण भारतात खूप शुभ मानला जातो आणि या दिवशी सोने, चांदी आणि इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते.

दिल्ली

  • 65,490 (22 कॅरेट)

  • 71,430 (24 कॅरेट)

लखनौमध्ये सोन्याचा भाव

  • 65,490 (22 कॅरेट)

  • 71,430 (24 कॅरेट)

मुंबईत सोन्याचे भाव

  • 65,340 (22 कॅरेट)

  • 71,280 (24 कॅरेट)

पुण्यात सोन्याचा भाव

  • 65,340 (22 कॅरेट)

  • 71,280 (24 कॅरेट)

सोन्याची शुद्धता कशी ओळखायची:

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.(How to determine purity of gold

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात. ( What is the difference between 22 and 24 carats? )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT