gold rate today in pune 10 gram gold rs 62950 today rate increase of rs 1130 hdfc securities eSakal
Personal Finance

Gold-Silver Rate Today : पुणे बाजारपेठेत २४ कॅरट शुद्ध सोन्याचा भाव आज प्रति दहा ग्रॅममागे ६३,००० रुपये

जागतिक बाजारातील तेजीमुळे आज सोन्याच्या भावात जोरदार वाढ झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज कंपनीने सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : गेले काही दिवस सातत्याने चढता आलेख नोंदविणाऱ्या सोन्याच्या भावाने आज उच्चांकी ११३० रुपयांची उसळी घेतली आणि सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅममागे ६२,९५० रुपयांवर पोचला. जागतिक बाजारातील तेजीमुळे आज सोन्याच्या भावात जोरदार वाढ झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज कंपनीने सांगितले.

नवी दिल्लीत आज सोन्याचा भाव ६२,९५० रुपये झाला. याआधी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅममागे ६१,८२० रुपये होता. चांदीचा भावही प्रति किलो २,३५० रुपयांनी वाढून ७७,४०० रुपये झाला. मागील व्यवहारात तो ७५,०५० रुपये झाला होता. पुणे बाजारपेठेत २४ कॅरट शुद्ध सोन्याचा भाव आज प्रति दहा ग्रॅममागे ६३,००० रुपये होता.

अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेचे प्रथमच व्याजदर वाढविण्याची मोहीम संपल्याचे संकेत, रोखे उत्पन्नातील घसरण आणि डॉलर निर्देशांकातील घट यामुळे सोन्याचे भाव वधारले. ‘कॉमेक्स’वर सोन्याचा भाव २.५ टक्क्यांनी वाढला, असे एचडीएफसी सिक्युरिटीजमधील कमोडिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले.

कॉमेक्सवर स्पॉट गोल्ड प्रति औंस २,०३२ डॉलरवर व्यवहार करत होते. एक आठवड्यांपूर्वी सोन्याचे भाव २१०० डॉलरपर्यंत वाढले होते. नंतर ते १९८० डॉलरपर्यंत खाली आले आहे. भाव वाढले म्हणून गुंतवणूकदारांनी सोनेखरेदीकडे वळणे योग्य नाही. भाव कमी जास्त होत असतात. त्यामुळे टप्प्याटप्प्याने खरेदी करून भावातील चढ-उतारांचा लाभ घेणे गरजेचे आहे, असा सल्लाही अमित मोडक यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT