Gold Price Today: आज अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. कालच्या किमतीशी तुलना केल्यास 10 ग्रॅम सोन्याचा भाव 2300 रुपयांनी कमी झाला आहे. आज बुधवारी दिल्ली, मुंबईमध्ये सोन्याचा भाव 71000 रुपयांच्या आसपास पोहोचला आहे.
राजधानी दिल्लीत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 71,000 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव मुंबई आणि कोलकाता येथे 70,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चेन्नईमध्ये 71,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीबद्दल बोलायचे झाले तर त्याचा भाव 87,900 रुपये प्रति किलो आहे.
दिल्लीत सोन्याचा भाव
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव अंदाजे 65,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबईत सोन्याचा भाव
मुंबईत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 64,940 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
अहमदाबादमध्ये आजचा सोन्याचा भाव
अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 64,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सोन्या-चांदीबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात सरकारने सोने-चांदीवरील सीमाशुल्कात कपात करण्याची घोषणा केली आहे. अर्थसंकल्पातील या घोषणेनंतर सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन सरकारी सुट्टी वगळता शनिवार आणि रविवारी दर जाहीर करत नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवर सोन्याची किरकोळ किंमत देखील जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल. सोन्याच्या किमतीची माहिती तुम्हाला एसएमएसद्वारे पाठवली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.