Gold Return highest in 14 years  Sakal
Personal Finance

Gold Return: सोन्याची चमक वाढली; गेल्या एका वर्षात दिला 'गोल्डन रिटर्न', पहा 14 वर्षांचा इतिहास

राहुल शेळके

Gold Return: भारतात सोन्याची क्रेझ मोठ्या प्रमाणावर आहे. ग्राहक आपल्या बचतीतून सोन्याचे दागिने खरेदी करतात. भारतातील सोन्याची सरासरी खरेदी देशाच्या एकूण जीडीपीएवढी झाली तर नवल वाटायला नको. सोने हा गुंतवणूक करण्यासाठी चांगला पर्याय असूनही, सामान्य लोक त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. कारण बहुतेक भारतीय सोन्याच्या दागिन्यांमध्ये पैसे गुंतवतात.

या वर्षी सोन्याच्या भावात 14 वर्षातील सर्वाधिक वाढ दिसून येत असून या संपूर्ण वर्षात सोन्याच्या भावात 28 ते 29 टक्के वाढ झाली आहे. सोन्याच्या भावात किरकोळ चढ-उतार होत असतात पण त्याचा सोन्याच्या परताव्यावर परिणाम होत नाही. या दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कारण जागतिक बाजारातही सोने चमकत आहे. दिवाळीत धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा असल्याने भारतीयांना सोन्याचे दागिने किंवा सोन्याची नाणी, मूर्ती इत्यादी खरेदी करणे आवश्यक वाटते आणि त्यामुळे मागणी खूप वाढते.

Gold Return

सोने गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा देत आहे. ज्यामुळे ते सर्वात शक्तिशाली गुंतवणूक मालमत्तेच्या यादीत वरच्या स्थानावर आहे. सोन्याने एका वर्षात 29 टक्के परतावा दिला आहे, तर या वर्षी (15 ऑक्टोबर 2024) पर्यंत सोन्याने आपल्या गुंतवणूकदारांना 21 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 3 वर्षांत सोन्याने 62% परतावा दिला आहे.

शेअर्सचा अपवाद म्हणून विचार केल्यास, हे समजून घेतले पाहिजे की शेअर बाजारात जितके चांगले परतावे आहेत तितक्याच प्रमाणात जोखीम देखील आहे, तर सोने हा नेहमीच सुरक्षित मालमत्ता वर्ग मानला गेला आहे. सध्या जागतिक तणावाच्या काळातही सोन्याने आठवडाभरात 2 टक्के आणि महिन्यात 4 टक्के परतावा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुती सरकारनं काढलेला SC-ST उपवर्गिकरणासंबंधीचा जीआर रद्द होणार? राज्य निवडणूक अधिकाऱ्यांचे संकेत

IPL 2025 News : दिल्ली कॅपिटल्स फक्त ३ खेळाडूंना रिटेन करणार, नावं समजली; कोचच्या पदासाठी भारताचा माजी फलंदाज आघाडीवर

Latest Maharashtra News Updates : वाघोली, खराडी भागात पावसाला सुरुवात

Buldhana Assembly Election 2024 : दिवाळीच्या थंडीत राजकारण तापणार! फटाके कोण फोडणार आणि कुणाला लागणार याचीच सर्वत्र चर्चा

IND vs NZ 1st Test : बंगळुरूचा पाऊस टीम इंडियाचे WTC Final Scenario बिघडवतोय; रोहित शर्माचं टेंशन वाढवतोय

SCROLL FOR NEXT