Gold-Silver Rate Today sakal
Personal Finance

Gold Silver Price : आनंदाची बातमी! आज सोन्याचा दर पाच आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर; जाणून घ्या दर

भारतीय बाजारपेठेत आज सोन्याच्या किंमतीत घसरण दिसून येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gold Silver Price Today : जागतिक स्तरावर सोन्या-चांदीच्या किंमतीतील चढ-उतार कायम आहेत. भारतीय बाजारपेठेत आज सोन्याच्या किंमतीत थोडा बदल दिसून आला आहे.

यूएस फेडच्या दर वाढीच्या चिंतेमुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची किंमत ₹58,847 प्रति 10 ग्रॅम वर आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी, MCX वर एप्रिल 2023 साठी सोन्याचा दर तिसऱ्या आठवड्यात कमी झाला.

कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, ''अमेरिकन डॉलरच्या दरात वाढ झाल्याने सोन्याच्या किमतीतील तेजीला ब्रेक लागला आहे.'' आज सोन्याचे दर ₹55,500 ते ₹57,200 प्रति 10 ग्रॅम श्रेणीत आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 57,710 रुपये

दिल्ली - 57,100 रुपये

हैदराबाद - 56,950 रुपये

कोलकत्ता - 56,950 रुपये

लखनऊ - 57,100 रुपये

मुंबई - 56,950 रुपये

पुणे - 56,950 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.

24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: संजू सॅमसनची Century! ट्वेंटी-२०त विराट-रोहितच काय, तर एकाही भारतीयाला नाही जमलाय हा विक्रम

Assembly Election 2024 : पालघर जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का; कुणबी सेनेचा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा

Champions Trophy 2025 : BCCI पाकिस्तानात न जाण्यावर ठाम; PCB म्हणते लेखी द्या, मग बघतोच...! IND vs PAK यांच्यात 'वॉर' जोरदार

SA vs IND T20I: अन् सूर्याच्या टीम इंडियानं राष्ट्रगीताचा अपमान होऊ दिला नाही; साऊंड बंद झाला, पण...

Trending News: अरे ये कैसा हुआ रे बाबा ! नवरा-बायकोचं भांडण अन् रेल्वेला लागला तीन कोटींचा चुना

SCROLL FOR NEXT