Gold Silver Price 16 March 2023 : फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या किंमतीत घट नोंदवण्यात आली आहे. गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) सोन्याच्या घसरणीने उघडले. 24 कॅरेट सोने 343 रुपयांच्या घसरणीसह 57,955 रुपये प्रति 10 ग्रॅम वर उघडले.
बुधवारी वायदा बाजारात सोने 58,338 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. सोने 58,847 रुपयांच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च किंमतीपेक्षा 1,000 रुपयांनी स्वस्त आहे. त्याच वेळी, सकाळी 10.42 वाजता सोन्यामध्ये आणखी घसरण नोंदवली गेली आणि सोने 57,925 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे.
चांदीची स्थिती काय आहे?
गुरुवारी वायदे बाजारातही चांदीवर दबाव दिसून येत असून त्यातही घसरण नोंदवली जात आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदीच्या दरात 0.65 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली असून चांदी 67,080 रुपये प्रति किलोवर उघडला गेला. सकाळी 10.42 पर्यंत चांदीमध्ये आणखी घसरण नोंदवली गेली आणि चांदी 66,926 रुपये प्रति किलो वर व्यवहार करत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीची काय स्थिती आहे?
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत 0.3 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली असून, ते 1,912.48 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, चांदीमध्येही घसरण नोंदवली जात आहे. चांदी 0.4 टक्क्यांनी घसरून 21.71 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे भाव :
दिल्ली - 22 कॅरेट सोने 53,200 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 69,000 रुपये प्रति किलो
मुंबई- 22 कॅरेट सोने 53,050 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 69,000 रुपये प्रति किलो
कोलकाता- 22 कॅरेट सोने 53,050 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 69,000 रुपये प्रति किलो
चेन्नई- 22 कॅरेट सोने 53,800 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 72,500 रुपये प्रति किलो
सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी :
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.
बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.
हॉलमार्क (Hallmark)-
सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.