दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. सोन्याचे भाव 61 हजार रुपयांच्या खाली तर चांदीचे भाव 70 हजार रुपयांच्या खाली आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या भावात वाढ होताना दिसत आहे.
13 नोव्हेंबर 2023 रोजी वेगवेगळ्या शहरांमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव वेगवेगळा असला तरी सरासरी 61,000 रुपये आहे. विशेषतः, 10 ग्रॅम 24-कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 60,490 रुपये आहे, तर त्याच प्रमाणात 22-कॅरेट सोन्याचा भाव 55,450 रुपये आहे.
नाशिक - 60,530 रुपये
सोलापूर - 60,590 रुपये
मुंबई - 60,490 रुपये
पुणे - 60,490 रुपये
अमरावती- 60,590 रुपये
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.
बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.
सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.