Gold Silver Rate ESakal
Personal Finance

Gold Silver Price Today: सोने 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, काय आहे आजचा भाव?

राहुल शेळके

Gold Silver Price Today Latest Update On 4 October 2023:

सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने घसरण सुरू आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव आज 56,000 च्या जवळ आहे. याशिवाय चांदीच्या भावातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. चांदीचा भाव आज 67,000 च्या जवळ आहे.

याशिवाय जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात घसरणीमुळे सोन्याचा भाव 7 महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. भविष्यात सोने आणखी स्वस्त होऊ शकते.

सोने किती स्वस्त झाले?

आजही मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. आज एमसीएक्सवर सोने 0.18 टक्क्यांनी घसरून 56,827 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय चांदी 0.52 टक्क्यांनी घसरून 67,042 रुपये प्रति किलोवर आहे.

सोने सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

जागतिक बाजारातही सोन्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचा भावा प्रति औंस 1815 डॉलरच्या खाली पोहोचली आहे. सोन्याची ही सात महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. कॉमेक्सवर चांदीचा भाव 21.19 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी :

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT