Gold Silver Price Today Precious metals record hike on MCX Latest Update 26 October 2023  Sakal
Personal Finance

Gold Rate Today: चांदीने 72 हजारांचा टप्पा केला पार, सोन्याचे भावही वाढले, जाणून घ्या आजचा भाव?

Gold Rate Today in India: गुरूवारी सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत

राहुल शेळके

Gold Silver Price Today Latest Update 26 October 2023:

गुरूवारी सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत कारण मध्य पूर्वतील संघर्षाने गुंतवणूकदार चिंतेत आहेत. काल स्थानिक बाजारातही सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली. सणासुदीचा हंगाम सुरू होताच सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जर तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा भाव जाणून घ्या.

आज सोन्याचा भाव 61,000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे, तर चांदीही 72,000 रुपयांच्या वर गेली आहे. गुरुवारी सोन्याचा भाव 60,824 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​होता.

यानंतर सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ झाली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत कालच्या तुलनेत 91 रुपये किंवा 0.15 टक्क्यांनी वाढून 60,917 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे. काल फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव 60,826 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला.

चांदी 72,000 रुपयांच्या पुढे

सोन्याव्यतिरिक्त चांदीमध्येही आज वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव 72,009 रुपये प्रति किलो आहे. कालच्या तुलनेत 222 रुपयांनी चांदीत वाढ झाली आहे. काल मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदी 71,787 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई- 62,200 रुपये

  • कोलकत्ता - 61,960 रुपये

  • दिल्ली - 62,110 रुपये

  • मुंबई - 61,960 रुपये

  • पुणे - 61,960  रुपये

  • पटना - 62,010 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी :

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT