Gold Silver Price Sakal
Personal Finance

Gold Silver Price: सोने खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा; सोन्याच्या भावात घसरण, जाणून घ्या आजचा दर

सोने आणि चांदीच्या भावात घसरण नोंदवण्यात आली आहे.

राहुल शेळके

Gold Silver Price: आज, 11 मे 2023 रोजी, भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात घसरण नोंदवण्यात आली आहे. मात्र, सोन्याचा भाव 61 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीचा भावही प्रतिकिलो 76 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.

राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 61430 रुपये आहे. तर 999 शुद्धतेची चांदी 76,351 रुपये आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव मंगळवारी संध्याकाळी 61533 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज (11 मे) सकाळी 61,430 रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारे सोने-चांदी स्वस्त झाले आहेत.

आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे?

ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज सकाळी 61,185 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याचवेळी 916 शुद्धतेचे (22 कॅरेट) सोने आज 56,269 रुपये झाले आहे.

याशिवाय 750 शुद्ध (18 कॅरेट) सोन्याचा भाव 46,072 रुपयांवर आला आहे. दुसरीकडे, 585 (14 कॅरेट) शुद्धत सोन्याचा भाव 35,936 रुपयांवर आला आहे. याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा भाव आज 76,351 रुपये झाला आहे.

भारतीय बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने जारी केलेल्या किंमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किंमतीची माहिती देतात. या सर्व किंमती कर आणि मेकिंग चार्जेसचा यात समावेश नाही.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT