Gold Prices All Time High Sakal
Personal Finance

Gold Rate: सोने वर्षाच्या अखेरीस 1,00,000 रुपयांच्यावर जाणार; ग्लोबल ब्रोकरेज फर्मने वर्तवला अंदाज

राहुल शेळके

Gold To Reach New Height: आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात सोन्याच्या भावाने नवा विक्रम निर्माण केला आहे. अलीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस 2685.42 डॉलरवर पोहोचली, तर MCX वर देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव 75,750 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. यंदा सोन्याच्या भावात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सोन्याच्या भावात वाढ होण्यामागे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेली व्याजदर कपात हे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. फेडने या महिन्यात व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सची कपात केली, त्यानंतर व्याजदर 4.75 ते 5 टक्क्यांवर आला. त्यामुळे डॉलर कमकुवत झाला असून त्याचा फायदा सोन्याला झाला आहे. असा अंदाज ग्लोबल ब्रोकरेज फर्म युबीएसने वर्तवला आहे.

याशिवाय इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील वाढता तणाव आणि जागतिक अस्थिरता यामुळेही गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत. या वातावरणात डिसेंबर पर्यंत सोन्याचा भाव एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

कोटक सिक्युरिटीजचे अनिंद्य बॅनर्जी यांच्या मते, पुढील 4 वर्षांत सोन्याची किंमत प्रति औंस 4000 डॉलर पर्यंत पोहोचू शकते, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,10,000 रुपयांच्यावर पोहोचण्याची शक्यता आहे.

जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची सातत्याने होणारी खरेदी हे देखील या वाढीचे प्रमुख कारण आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष सुरक्षित मालमत्तेकडे वळल्याने सोन्याच्या मागणीतही वाढ झाली आहे.

XM ऑस्ट्रेलियाचे सीईओ पीटर मॅकगुइर म्हणाले, मध्यवर्ती बँकांद्वारे मोठी खरेदी होत आहे. ही खरेदी गेल्या दशकभरापासून सुरू आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढत आहे. जोपर्यंत अमेरिकन डॉलरमध्ये मोठी वाढ होत नाही, किंवा भू-राजकीय तणाव कमी होत नाही, तोपर्यंत सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: कुणबी दाखले मिळवतानाच्या अडचणी आता कमी होणार! शिंदे समितीच्या अहवालावर निघणार जीआर

Atal Setu: गाडी थांबवली अन् व्यक्तीची अटल सेतूवरून समुद्रात उडी, वर्षभरातील चौथी घटना

Vidhan Sabha Election 2024: सुमारे 100 जागांसाठी तब्बल 1,688 इच्छुकांचे अर्ज; काँग्रेसचा भाव वधारला

गाईला राज्यमातेचा दर्जा देण्याच्या सरकारचा निर्णय, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले...

Dharavi: विरोध, गोंधळ अन् कारवाई; अखेर धारावीतील 'त्या' मशिदीचा वादग्रस्त भाग समितीच्या लोकांनी पाडला

SCROLL FOR NEXT