Cibil Score Sakal
Personal Finance

Cibil Score: सिबिल स्कोअर खराब आहे? आता फक्त कर्जच नाही तर सरकारी बँकेत नोकरी मिळणेही होणार अवघड

राहुल शेळके

Cibil Score: घर बांधण्याचे असेल किंवा व्यवसाय सुरू करण्याचा असेल तर कर्जाची गरज भासते. जर तुम्ही लहान किंवा मोठे कर्ज घेण्याचा विचार करत असाल आणि बँकेने तुम्हाला परवडणाऱ्या दरात कर्ज द्यावे असे वाटत असेल, तर तुमचा सिबिल स्कोअर समजून घेणे आणि तो नीट ठेवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

सिबिल स्कोअर चांगला नसेल तर आता सरकारी बँकांमध्ये नोकरी मिळणेही कठीण झाले आहे. IBPS ने आपल्या अलीकडील अधिसूचनेत म्हटले आहे की नोकरीसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी हे तपासले पाहिजे की त्यांचा सिबिल स्कोअर चांगला आहे की नाही.

सिबिल स्कोअर 650 किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे

जर तुम्हीही बँकेत नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत करत असाल, तर लक्षात ठेवा की आता फक्त पात्रता किंवा मेहनत करून चालणार नाही, तर आता तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी तुमच्या CIBIL स्कोअरकडे लक्ष द्यावे लागेल.

बँकिंग रिक्रूटमेंट एजन्सी  इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) व्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी अनिवार्य पात्रता म्हणून CIBIL स्कोर जोडला आहे. यानुसार, अर्जदाराचा CIBIL 650 किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.

ऑफर लेटर रद्द केले जाऊ शकते

IBPS च्या नवीन अधिसूचनेनुसार, ज्या उमेदवारांचे सिबिल स्कोअर 650 पेक्षा कमी आहे त्यांना सरकारी बँकेत नोकरी मिळण्यात अडचणी येतील. क्रेडिट स्कोअर नसल्यास, अर्जदाराला बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आवश्यक असेल, असे न केल्यास ऑफर लेटर रद्द केले जाऊ शकते.

बँक नोकऱ्यांसाठी पात्रता निकषांमध्ये जोडलेले हे नवीन क्रेडिट क्लॉज CIBIL स्कोअरचे महत्त्व दर्शवते. याशिवाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यापूर्वी चांगला सिबिल स्कोअर असणे अत्यंत आवश्यक आहे.

सिबिल स्कोअर का महत्त्वाचा आहे?

CIBIL स्कोअर एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट इतिहास दर्शवतो. तुम्ही किती वेळा कर्ज घेतले आहे, तुमच्याकडे आता किती कर्जे आहेत, तुम्ही किती क्रेडिट कार्ड वापरत आहात आणि तुमच्याकडे किती देणी आहेत हे CIBIL स्कोअर सांगतो.

बँका नेहमी व्यक्तीचा CIBIL स्कोर तपासल्यानंतरच कर्ज मंजूर करतात. सिबिल स्कोअरला क्रेडिट स्कोअर असेही म्हणतात. याच्या मदतीने, कर्ज घेतलेल्या अर्जदाराची सर्व माहिती बँकांना मिळते, जसे की त्याने कर्जाची परतफेड वेळेवर केली की नाही. त्या व्यक्तीने कोणत्याही कर्जाच्या पेमेंटमध्ये चूक केली आहे का?

अशा प्रकारे तुम्ही सहज सुधारणा करू शकता

जर तुम्ही कोणत्याही कर्जाच्या EMI ची परतफेड करण्यात चूक केली असेल तर त्याचा तुमच्या CIBIL स्कोअरवर परिणाम होतो. यामुळे तुमचा स्कोअर कमी होतो. जर तुम्ही क्रेडिट कार्डने खर्च केला आणि वेळेवर बिल भरले नाही तर स्कोअरवरही वाईट परिणाम होतो.

क्रेडिट स्कोअर खराब असल्यास भविष्यात कर्ज घेण्यात अडचण येते. तुमचा CIBIL स्कोर सुधारण्यासाठी वेळेवर पेमेंट करा. अंतिम मुदतीपूर्वी क्रेडिट कार्ड पेमेंट किंवा इतर कोणतेही बिल किंवा ईएमआय भरा.

याशिवाय आवश्यक तेवढाच खर्च करा आणि राहिलेली रक्कम वेळेवर भरा. क्रेडिट कार्डने खर्च करताना तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojna: लाडकी बहिण योजना सरकारनं तुर्तास थांबवली! काय आहे कारण? जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

JioCinema: जिओ सिनेमा लवकरच बंद होणार! मुकेश अंबानी घेऊ शकतात मोठा निर्णय; काय आहे कारण?

Local Train Derailed : मुंबईत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला; प्रवाशांचा खोळंबा

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT