Medicine Price Reduction Sakal
Personal Finance

Medicine Price: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! 70 औषधे होणार स्वस्त; सरकारने NPPAच्या बैठकीत घेतला निर्णय

Medicine Price Reduction: सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. पेनकिलर आणि अँटिबायोटिक्ससह 70 अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी अनेक आजारांवरील उपचार स्वस्त होणार आहेत.

राहुल शेळके

Medicine Price Reduction: सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. पेनकिलर आणि अँटिबायोटिक्ससह 70 अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी अनेक आजारांवरील उपचार स्वस्त होणार आहेत.

नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अनेक अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारने या आठवड्यात NPPA बैठकीत घेतलेल्या निर्णयाची घोषणा केली आहे.

एनपीपीए देशात विकल्या जाणाऱ्या अत्यावश्यक औषधांच्या किमती नियंत्रित करते, ज्याचा वापर सामान्य लोक विविध रोगांवर उपचार करण्यासाठी करतात. बैठकीत 70 औषधी आणि 4 विशेष औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोणती औषधे स्वस्त होणार आहेत?

या बैठकीत NPPA ने 70 औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला, ज्यात वेदना कमी करण्यासाठी औषधे, म्हणजे वेदनाशामक, अँटिबायोटिक्स, ताप, संसर्ग, अतिसार, स्नायू दुखणे, मधुमेह, रक्तदाब, हृदय आणि इतर अनेक आजारांवरील औषधांचा समावेश यात आहे.

यापूर्वी जून महिन्यातही सरकारने अनेक जीवनावश्यक औषधांच्या किमती कमी केल्या होत्या. NPPA ने जूनमध्ये झालेल्या 124 व्या बैठकीत सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या 54 औषधांच्या आणि 8 विशेष औषधांच्या किमती कमी केल्या होत्या.

अँटीबायोटिक्स, मल्टी व्हिटॅमिन, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित औषधांच्या किमती गेल्या महिन्यात कमी करण्यात आल्या होत्या. याशिवाय कॅन्सरसारख्या आजारांवर उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधेही स्वस्त करण्यात आली.

याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होणार आहे

अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी केल्याने देशातील करोडो लोकांना थेट फायदा होणार आहे. कोट्यवधी लोक विविध रोगांवर उपचार करण्यासाठी अनेक औषधे खरेदी करतात. गेल्या महिन्यात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पानंतर सुमारे दोन आठवड्यांनंतर सरकारचा हा निर्णय आला आहे. औषधांच्या किमती परवडण्याजोग्या करण्याच्या दिशेने सरकारकडून पुढाकार घेणे अपेक्षित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

Pandharpur Vidhansabha: पंढरपूरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

Fact Check :'गंभीरकडून काही होणार नाही, मला कमबॅक करावं लागेल'; MS Dhoniचा Video Viral, चाहते सैराट

Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

SCROLL FOR NEXT