Government to buy back sovereign bonds worth Rs 40,000 crore in a surprise move  Sakal
Personal Finance

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

राहुल शेळके

Government to buy back sovereign bonds: रोख रकमेचा तुटवडा भरून काढण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मोठे पाऊल उचलणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 40 हजार कोटी रुपयांच्या सिक्युरिटीजची पुनर्खरेदी (बायबॅक) करणार आहे. त्यांच्या खरेदीसाठी आरबीआय लिलावाचा मार्ग अवलंबणार आहे. ही खरेदी नवीन प्रकारच्या लिलाव पद्धतीद्वारे केली जाणार आहे.

RBI ज्या बाँड बायबॅक करणार आहे, त्या सिक्युरिटीजमध्ये 6.18 टक्के GS 2024, 9.15 टक्के GS 2024, 9.15 टक्के GS 2024, 6.89 टक्के GS 2025 यांचा समावेश आहे. या सिक्युरिटीज 4 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर आणि 16 नोव्हेंबर रोजी मॅच्युअर होणार आहेत.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, हा लिलाव 9 मे रोजी रिझर्व्ह बँकेच्या ई-कुबेर प्रणालीवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केला जाईल. सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत हा लिलाव होणार आहे. लिलावाचा निकाल 11 मे रोजी लागेल. किंबहुना, कर्जाची परतफेड करण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

बायबॅक म्हणजे काय?

जेव्हा एखादी कंपनी गुंतवणूकदारांकडून स्वतःचे शेअर्स खरेदी करते तेव्हा त्याला बायबॅक म्हणतात. बायबॅक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या शेअर्सचे अस्तित्व संपुष्टात येते. बाजारात उपलब्ध शेअर्सची संख्या कमी करण्यासाठी आणि उर्वरित शेअर्सचे मूल्य वाढवण्यासाठी कंपन्या बायबॅक करतात. अशा परिस्थितीत कंपनी बायबॅक करते जेव्हा कंपनीला असे वाटते की आपल्या शेअर्सचे मूल्य कमी झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT