GST collection 1 lakh 57 thousand crores Tax revenue 12 percent growth compared last year sakal
Personal Finance

GST : जीएसटी संकलन १ लाख ५७ हजार कोटींवर

कर महसूल : गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत वार्षिक १२ टक्के वाढ

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशातील वस्तू आणि सेवा करसंकलन (जीएसटी) मे महिन्यात एक लाख ५७ हजार ९० कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्यातील एक लाख ४० हजार ८८५ कोटींच्या तुलनेत त्यात १२ टक्के वाढ झाली आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिलच्या तुलनेत त्यात मोठी घट झाली आहे. एप्रिल २०२३ मध्ये जीएसटी संकलन विक्रमी एक लाख ८७ हजार कोटी रुपये होते. सलग तिसऱ्या महिन्यात जीएसटी संकलन १.५० लाख कोटींहून अधिक झाले आहे.

मे महिन्यात वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील महसुलाच्या १२ टक्के जास्त होता, तर सेवांच्या आयातीसह देशांतर्गत व्यवहारातून मिळालेला महसूल, गेल्या वर्षीच्या मे महिन्यातील महसुलापेक्षा ११ टक्के अधिक आहे.

सरकारने केंद्रीय जीएसटी ३५,५६९ कोटी आणि एकात्मिक जीएसटी २९,७६९ कोटी राज्यांना दिले आहेत. नियमित करवाटपानंतर केंद्र आणि राज्यांच्या एकूण महसुलात केंद्रीय जीएसटी ६३,७८० कोटी आणि राज्य जीएसटी ६५,५९७ कोटी आहे.

केवळ तीन राज्यांमध्ये घट

देशातील बहुतांश राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी जीएसटी संकलनात वाढ नोंदवली आहे. केवळ मणिपूर, छत्तीसगढ आणि पंजाब या तीन राज्यांनी घट नोंदवली आहे. मे २०२२ च्या तुलनेत लक्षद्विप या मे महिन्यात सर्वाधिक २१० टक्के वाढ नोंदवली आहे.

त्यानंतर ११३ टक्के वाढ लडाखने आणि ५५ टक्के वाढ चंडीगढने नोंदवली आहे. महाराष्ट्राने १६ टक्के वाढ नोंदवली असून, मे २०२२ मध्ये करमहसूल २०,३१३ कोटी रुपये, तर २३,५३६ कोटी रुपये होता.

करमहसुलातील वर्गीकरण (कोटी रुपयांमध्ये)

  • केंद्रीय जीएसटी - २८,४११

  • राज्य जीएसटी - ३५,८२८

  • एकात्मिक जीएसटी - ८१,३६३

  • अधिभार - ११,४८९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: नवं गृहनिर्माण धोरण अन् मुलांना मोफत शिक्षण... शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा वचननामा जाहीर

Shreyas Iyer चे द्विशतक! BCCI अन् KKR ला करारा जवाब; सिद्धेश लाडसोबत विक्रमी ३०० धावांची भागीदारी

कमी वयातच दूरदृष्टी कमी झाली असेल डोळ्याची; तर चष्माच नंबर घालवण्यासाठी करा ह्या फळांचा सेवन

Chitra Wagh : महायुती पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 'इतके' रुपये देणार; चित्रा वाघ यांची मोठी घोषणा

लाडक्या मालिकेतील अभिनेत्रीबरोबर काम करणार अशोक मामा ; या स्टारकिडचीही लागली वर्णी

SCROLL FOR NEXT