GST Council Meeting: वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेची 53 वी बैठक आज 22 जून रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. जवळपास 8 महिन्यांनंतर होणारी जीएसटी कौन्सिलची ही पहिलीच बैठक आहे. याशिवाय एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात होणारी जीएसटी कौन्सिलची ही पहिलीच बैठक आहे.
या बैठकीत जीएसटीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊन निर्णय घेतला जाऊ शकतात. यात गेमिंग कंपन्यांना पाठवलेल्या कर मागणी नोटिसांचाही समावेश आहे.
ही बैठक अशा वेळी होत आहे जेव्हा सरकारला काही आठवड्यात संसदेत अर्थसंकल्प सादर करायचा आहे. त्यामुळे जीएसटी परिषदेच्या बैठकीचे महत्त्व आणखी वाढले आहे. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते ते जाणून घेऊया.
खताला जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्याचा निर्णय परिषद घेऊ शकते, असे मानले जात आहे. सध्या खतांवर 5 टक्के जीएसटी आकारला जातो.
ऑनलाइन गेमिंगवर 28% कर लावण्याच्या निर्णयाचाही GST परिषदेच्या बैठकीत आढावा घेतला जाऊ शकतो. परिषदेने ऑक्टोबर 2023 मध्ये आपल्या 52 व्या बैठकीत ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग आणि कॅसिनोवर 28% GST लादण्याचा निर्णय घेतला होता.
पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणण्यावरही बैठकीत चर्चा होऊ शकते. सध्या पेट्रोल, डिझेल, जेट इंधन आणि नैसर्गिक वायू ही उत्पादने जीएसटीच्या कक्षेबाहेर आहेत. त्यांचा जीएसटीमध्ये समावेश करण्याची वेळोवेळी मागणी होत आहे. याचा फायदा होऊ शकतो, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.
कर्मचाऱ्यांना आणि ESOPs यांना दिलेल्या कॉर्पोरेट हमींचे कर परिणाम आणि मूल्यांकन यावर परिषदेने अधिक स्पष्टता आणावी अशी उद्योगाची अपेक्षा आहे. जीएसटी कौन्सिलच्या शेवटच्या बैठकीत, असा निर्णय घेण्यात आला होता की मूळ कंपनीने हमी दिलेल्या रकमेच्या 1% किंवा मोबदला यापैकी जे जास्त असेल त्यावर 18% GST आकारला जाईल.
या बैठकीत जीएसटी दर तर्कसंगत करण्यासाठी मंत्री गटाच्या (GoM) अहवालाला अंतिम रूप देण्यावर चर्चा होऊ शकते. याशिवाय टेलिकॉम कंपन्यांनी भरलेल्या स्पेक्ट्रम फीवर कर लावण्याचा मुद्दाही समाविष्ट आहे. मात्र, परिषदेच्या बैठकीचा अजेंडा अद्याप सार्वजनिक व्यासपीठावर आलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.