GST Fraud Case Sakal
Personal Finance

GST Fraud Case: 2,600 बनावट कंपन्या अन् सरकारला लावला हजारो कोटींचा चुना; बड्या व्यावसायिकांना अटक

GST Fraud Case: देशात 2,600 हून अधिक बनावट कंपन्या उघडून भारत सरकारच्या महसुलाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या टोळीतील दोन म्होरक्यांना पोलिसांनी अटक केली. इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन दोघांनी फसवणूक केली होती.

राहुल शेळके

GST Fraud Case: देशात 2,600 हून अधिक बनावट कंपन्या उघडून भारत सरकारच्या महसुलाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या टोळीतील दोन म्होरक्यांना पोलिसांनी अटक केली. इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन दोघांनी फसवणूक केली होती.

अनेक दिवसांपासून वॉन्टेड असलेल्या आरोपींवर नोएडा पोलिसांनी प्रत्येकी 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आतापर्यंत या टोळीतील 32 आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी व्यावसायिक असून ते मेटलचा व्यवसाय करतात.

पोलिस उपायुक्त (गुन्हे) शक्ती मोहन अवस्थी यांनी सांगितले की, जीएसटी फसवणुकीचे सूत्रधार अजय शर्मा आणि संजय जिंदाल यांना पोलिसांनी अटक केली आहे.

हे दोघेही हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी आहेत. आरोपी संजय जिंदाल हा मेसर्स एएस ब्राउनी मेटल अँड अलॉय प्रायव्हेट लिमिटेडचा मालक असून अजय शर्मा हा मेसर्स क्रिस्टल मेटल इंडस्ट्रीजचा मालक आहे. (GST Fraud Case 2 businessmen arrested in noida accused of scamming with fake companies)

संजय जिंदाल याने सुमारे 17 कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिटची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे आणि अजय शर्माने 8.5 कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिटची फसवणूक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय जिंदालने त्याच्या कंपनीच्या नावाखाली सुमारे 20 बनावट कंपन्या तयार केल्या.

जीएसटी घोटाळा म्हणून ओळखले जाणारे हे प्रकरण जून 2023 मध्ये उघडकीस आले होते आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून हजारो बनावट कंपन्यांनी सरकारी तिजोरीचे नुकसान केले. अधिकाऱ्यांच्या मते, पोलिस तपास शेकडो बनावट कंपन्या आणि त्यांच्याकडून सुमारे 10,000 कोटी रुपयांचे व्यवहार उघडकीस आले आहेत.

12 कोटींची मालमत्ता जप्त

गेल्या महिन्यात, नोएडा पोलिसांनी जीएसटी घोटाळ्यात गुंतलेल्या टोळीच्या सदस्यांची सुमारे 12 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती, ज्यामध्ये दिल्लीतील अनेक ठिकाणी स्थावर मालमत्तांचाही समावेश होता.

हे प्रकरण जून 2023 मध्ये उघडकीस आले जेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी एका पत्रकाराच्या पॅन तपशीलाचा वापर करून बनावट कंपन्यांच्या नोंदणीसाठी अर्ज केला आणि दोन फर्मची नोंदणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

Sharad Pawar : पवार, मुंडे यांनी बीडमधील राष्ट्रवादीतील कलह मिटवला, महायुतीच्या क्षीरसागरांना मिळाले समर्थन

Pune Crime News: पाकिटावर लिहिलं ५० हजार रुपये! आतमध्ये निघाली कागदं; पुण्यात पोलिस असल्याचा बनाव करुन सराफाची फसवणूक

SCROLL FOR NEXT