GST Evasion: जीएसटी चोरी रोखण्यासाठी अर्थ मंत्रालय अॅक्शन मोडमध्ये आले आहे. बिले तयार करण्यासह इतर मार्गांनी व्यापारी जीएसटी चुकवत असल्याचे आढळून आले आहे. चालू आर्थिक वर्षात 1.36 लाख कोटी रुपयांची चोरी उघडकीस आल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.
GST गुप्तचर महासंचालनालय GST चोरी शोधण्यासाठी एक मोठी मोहीम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत, विभागाने मोठ्या प्रमाणावर बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट दाव्यांची प्रकरणे शोधून काढली आहेत. डीजीजीआयने गेल्या साडेतीन वर्षांत 57,000 कोटी रुपयांची जीएसटी चोरी शोधली असून या प्रकरणात 500 जणांना अटकही करण्यात आली आहे.
चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 14,000 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटची एकूण 1040 प्रकरणे उघडकीस आली असून त्यात आतापर्यंत 91 जणांना अटक करण्यात आली आहे.
2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 1.36 लाख कोटी रुपयांची जीएसटी चोरी आढळून आली आहे, ज्यामध्ये बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचाही समावेश आहे आणि लोकांनी स्वेच्छेने 14,108 कोटी रुपये जमा केले आहेत.
जून 2023 मध्ये, DGGI ने देशभरातील सिंडिकेटचे मास्टरमाइंड ओळखून त्यांना अटक करण्यावर भर दिला होता. तांत्रिक साधनांद्वारे डेटा अॅनालिटिक्सचा वापर करून GST चुकवणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
हे टॅक्स सिंडिकेट अनेकदा निष्पाप लोकांचा वापर करतात आणि त्यांना नोकरी, कमिशन, बँक कर्ज देण्याचे आमिष दाखवतात आणि त्यांच्याकडून केवायसी कागदपत्रे घेतात ज्याद्वारे त्यांच्या माहितीशिवाय आणि संमतीशिवाय बनावट, शेल फर्म किंवा कंपन्या उघडल्या जातात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.