Harshal Juikar Sakal
Personal Finance

Success Story: पुण्याच्या पठ्ठ्याची कमाल! इंजिनियरिंग केलं नाही तरी पटकावली गुगलमध्ये 50 लाखाची नोकरी

जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी गुगलमध्ये काम करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते.

राहुल शेळके

Harshal Juikar: जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी गुगलमध्ये काम करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. कारण काम आणि पगारा सोबत गुगल कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा देते. पुण्यातील हर्षल जुईकर या विद्यार्थ्याने अभियांत्रिकीची पदवी नसूनही गुगलमध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळवली आहे.

हर्षलचे कौशल्य आणि दृढनिश्चयामुळे त्याला 50 लाखाचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे, अशी बातमी न्यूज18 ने दिली. हर्षलने अभियांत्रिकी क्षेत्राबाहेरील पदवी घेऊन शिक्षण पूर्ण केले.

अभियांत्रिकी पार्श्वभूमी असेल तरच टेक कंपन्यांमध्ये नोकरी मिळते हा स्टिरियोटाइप तोडून हर्षलने गुगलमध्ये नोकरी मिळवली आहे.

हर्षलने संगणक कोडिंग आणि प्रोग्रामिंगमचे कौशल्य आत्मसात केले. तो एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे तिथे त्याने ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये एमएससी पूर्ण केले आहे, हा एक अपारंपरिक अभ्यासक्रम आहे जो अनेकजण निवडत नाहीत. कौशल्य आणि अथक प्रयत्नाच्या जोरावर त्याने Google मध्ये नोकरी मिळवली.

प्रतिभा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा पाठपुरावा करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या Google ने हर्षलमध्ये कोडिंगची क्षमता पाहिली. त्याची उल्लेखनीय प्रतिभा ओळखून, Google ने त्याला आकर्षक पगाराच्या पॅकेजसह नोकरीची ऑफर दिली.

हर्षलने इतर विद्यार्थ्यांसाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत ज्यांना त्यांच्या आयुष्यात यशस्वी होण्याची इच्छा आहे. तो म्हणाला, “जिज्ञासू राहा, चिकाटी ठेवा आणि अज्ञात प्रदेश शोधण्यास घाबरू नका. आपल्या आवडीच्या शोधातच आपल्याला आपला उद्देश सापडतो." टेक कंपन्या सहसा नवीन महाविद्यालयीन पदवीधरांना मोठ्या पगाराच्या पॅकेजवर घेतात.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अलीकडील अहवालानुसार, फेसबुकची मूळ कंपनी मेटा आणि गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट या तीन सर्वाधिक पगार देणाऱ्या कंपन्यांमध्ये आहेत.

मेटा सरासरी पगाराच्या बाबतीत दुस-या क्रमांकावर आहे, कंपनी कर्मचार्‍यांना सुमारे $3,00,000 (अंदाजे रु. 2.46 कोटी) सरासरी पगार देते. अल्फाबेट $2,80,000 (अंदाजे रु. 2.29 कोटी) च्या सरासरी पगारा देते.

टेक कंपन्या अशा मोठ्या पगाराच्या पॅकेजवर कर्मचार्‍यांना कामावर घेत असल्या तरी ते त्यांच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांमध्ये कपात करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Vidhansabha: गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या महेश गायकवाडांची शिवसेनेतून हकालपट्टी

पुन्हा trump सरकार! कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, बहुमताचा आकडा केला पार

Hot Water Side Effects :  आरोग्यासाठी चांगलं असलं तरी अशा लोकांनी कधीच पिऊ नये गरम पाणी, त्रास अधिक वाढेल

Devendra Fadnavis: राहुल गांधींच्या हातातील संविधान 'लाल' का? देवेंद्र फडणवीसांनी का घेतली शंका?

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

SCROLL FOR NEXT