HDFC Bank Sakal
Personal Finance

HDFC Bank: जर्मनीच्या लोकसंख्येहून अधिक HDFC चे ग्राहक; जगातील चौथ्या मोठ्या बँकेविषयीच्या 5 गोष्टी

आजपासून HDFC चे HDFC बँकेत विलीनीकरण करण्यात आले आहे. त्यास शुक्रवारी दोन्ही मंडळांकडून मंजुरी मिळाली.

राहुल शेळके

HDFC Bank: आजपासून HDFC चे HDFC बँकेत विलीनीकरण करण्यात आले आहे. त्यास शुक्रवारी दोन्ही मंडळांकडून मंजुरी मिळाली. HDFC ही देशातील पहिली गृहनिर्माण वित्त कंपनी होती, ज्याची स्थापना 44 वर्षांपूर्वी हसमुखभाई पारेख यांनी केली होती.

1 जुलै ही विलीनीकरणाची तारीख आहे, तर 13 जुलै ही भागधारकांसाठी रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित करण्यात आली आहे. या डील अंतर्गत HDFC च्या प्रत्येक शेअरहोल्डरला प्रत्येक 25 शेअर्समागे HDFC बँकेचे 42 शेअर्स मिळतील.

NCD म्हणजेच नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर हस्तांतरित करण्याची तारीख 12 जुलै निश्चित करण्यात आली आहे. व्यावसायिक पेपर हस्तांतरित करण्याची तारीख 7 जुलै निश्चित करण्यात आली आहे.

40 अब्ज डॉलर्सचा करार

हे एक ऐतिहासिक रिव्हर्स विलीनीकरण आहे, ज्यामध्ये मूळ कंपनी HDFC चे HDFC बँकेत विलीनीकरण झाले. HDFC चे HDFC बँकेत विलीनीकरण हा भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील 40 अब्ज डॉलर मूल्याचा सर्वात मोठा व्यवहार आहे. या विलीनीकरणानंतर एकत्रित मालमत्ता 18 लाख कोटी रुपये झाली आहे.

बीएसईचे वेटेज 14 टक्क्यांवर पोहोचले

बीएसई निर्देशांकात आता एचडीएफसी बँकेचे सर्वाधिक वेटेज आहे. सध्या, बीएसई निर्देशांकात रिलायन्स इंडस्ट्रीज 10.4 टक्क्यांसह सर्वाधिक वेटेज आहे.

विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेचे वेटेज 14 टक्क्यांच्या जवळपास पोहोचेल. मार्केट कॅपच्या बाबतीत स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँकेला मागे टाकले आहे.

41 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय

विलीन झालेल्या संस्थेबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँकेचा एकूण व्यवसाय 41 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. एकूण संपत्ती 4.14 लाख कोटी रुपये झाली आहे.

ही माहिती 31 मार्च 2023 च्या डेटावर आधारित आहे. FY2023 मध्ये एकत्रित नफा 60 हजार कोटी रुपये होता.

जगातील चौथी सर्वात मोठी बँक

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, विलीनीकरणानंतर, एचडीएफसी बँक इक्विटी मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारावर जगातील चौथी सर्वात मोठी बँक बनली आहे.

एचडीएफसी बँकेनंतर जेपी मॉर्गन, इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, बँक ऑफ अमेरिका कॉर्प यांचा क्रमांक लागतो. त्यांचे मूल्यांकन 172 अब्ज डॉलर झाले आहे. ही एचएसबीसी, सिटीग्रुपपेक्षा मोठी बँक बनली आहे.

जर्मनीच्या लोकसंख्येपेक्षा ग्राहकांची संख्या जास्त आहे

विलीनीकरणानंतर, एचडीएफसी बँकेची ग्राहकसंख्या 120 दशलक्ष म्हणजे 12 कोटींवर पोहोचली. हे जर्मनीच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. शाखांचे जाळे 8,300 पर्यंत पोहोचेल आहे, तर कंपनीसोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 1.77 लाखांवर पोहोचेल.

अध्यक्ष दीपक पारेख काय म्हणाले

एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी शुक्रवारी विश्वास व्यक्त केला की एचडीएफसी बँकेने मालकी ताब्यात घेतल्याने समूह कंपन्यांमधील समन्वय अधिक दृढ होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT