HDFC Sakal
Personal Finance

World's Largest Banks: HDFC बँक बनली जगातील 7वी सर्वात मोठी बँक,

बँकिंग जगताच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे.

राहुल शेळके

World's Largest Banks: भारतातील कॉर्पोरेट जगतातील सर्वात मोठा करार म्हणजे HDFC चे HDFC बँकेत विलीनीकरण पूर्ण झाले आहे. विलीनीकरणानंतर उदयास आलेल्या एकत्रित कंपनीचे शेअर बाजारात सूचिबद्ध होताच हा करार पूर्ण झाला. यासोबतच भारतासह जागतिक बँकिंगमध्येही मोठा बदल दिसून आला.

रॉयटर्सच्या बातमीनुसार, नवीन शेअर्सच्या सूचीसह, HDFC बँक जगातील निवडक सूचीबद्ध कंपन्यांमध्ये सामील झाली आहे, ज्यांचे बाजार मूल्य 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे.़

बातमीनुसार, सोमवारच्या सुरुवातीच्या ट्रेडमध्ये HDFC बँकेचे मार्केट कॅप सुमारे 151 बिलियन डॉलर म्हणजेच 12.38 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

टॉप-10 मध्ये भारताचे पहिले नाव

रॉयटर्सच्या मते, यासह HDFC बँक आता मूल्यानुसार भारतातील सर्वात मोठी आणि जगातील 7वी सर्वात मोठी बँक बनली आहे. बँकिंग जगताच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे.

जेव्हा भारतातील बँकेचा जगातील पहिल्या 10 सर्वात मोठ्या बँकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या यादीत अजूनही अमेरिका आणि चीनच्या बँकांचे वर्चस्व आहे.

जगातील सर्वात मोठी बँक

मूल्यांकनानुसार, जगातील सर्वात मोठी बँक जेपी मॉर्गन चेस आहे, ज्याचे मूल्य 438 अब्ज डॉलर आहे. बँक ऑफ अमेरिका 232 अब्ज डॉलर मूल्यासह दुस-या स्थानावर आहे आणि इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना 224 बिलियन डॉलरसह तिस-या स्थानावर आहे.

तर कृषी बँक ऑफ चायना 171 बिलियन डॉलरसह चौथ्या, वेल्स फार्गो 163 बिलियन डॉलरसह पाचव्या आणि 160 बिलियन डॉलरसह HSBC सहाव्या स्थानावर आहे.

एचडीएफसी बँकेच्या वाढलेल्या उंचीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की आता तिचा आकार मॉर्गन स्टॅनली आणि गोल्डमन सॅक्स सारख्या जागतिक दिग्गज बँकांपेक्षा मोठा झाला आहे.

मॉर्गन स्टॅनलीचे सध्याचे बाजारमूल्य 143 अब्ज डॉलर आहे, तर गोल्डमन सॅक्सचे बाजार भांडवल 108 अब्ज डॉलर आहे. जगातील सर्वात मोठ्या बँकांच्या यादीत मॉर्गन स्टॅनली आठव्या क्रमांकावर आहे

तर गोल्डमन सॅक्स 15 व्या स्थानावर आहे. चायना कन्स्ट्रक्शन बँक आणि बँक ऑफ चायना टॉप-10 यादीत अनुक्रमे 9व्या आणि 10व्या स्थानावर आहेत.

या करारापूर्वीच HDFC बँक भारतातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक होती, हा करार सुमारे 40 बिलियन डॉलरमध्ये करण्यात आला होता आणि भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार असल्याचे सांगण्यात आले होते.

या करारानंतर, एचडीएफसी बँक भारतातील तिच्या जवळच्या स्पर्धक स्टेट बँक ऑफ इंडियापेक्षा पुढे गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT