HDFC Bank Loan Rate Hike Sakal
Personal Finance

HDFC Bank: HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा धक्का! बँकेने वाढवले ​​कर्जाचे व्याजदर, किती वाढवले दर?

राहुल शेळके

HDFC Bank Hikes Loan Rates: भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या नेतृत्वाखाली चलनविषयक धोरण समितीची बैठक आजपासून सुरू झाली असून ती 9 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. अशा परिस्थितीत चलनविषयक धोरण समितीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्यानंतर भारतातही रेपो दरात कपात होण्याची शक्यता लोकांना आहे. पण आरबीआयकडून दिलासा मिळण्यापूर्वीच एचडीएफसी बँकेने कर्जदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.

एचडीएफसी बँकेने कर्ज दर (MCLR) 5 बेस पॉइंट्स (bps) पर्यंत वाढवले ​​आहेत. त्यानंतर, HDFC बँकेचे MCLR व्याजदर आता 9.10% ते 9.45% दरम्यान असतील. नवीन दर आजपासून म्हणजेच 7 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाले आहेत.

HDFC बँकेने 6 महिने आणि 3 वर्षांच्या कालावधीच्या कर्जासाठी व्याजदर 5bps ने वाढवले ​​आहेत. याशिवाय इतर मुदतीच्या कर्जावरील व्याजदर कायम राहतील असे बँकेने सांगितले आहे.

दुरुस्तीनंतर, एका रात्रीसाठी व्याज दर 9.10% आणि एका महिन्यासाठी 9.15% झाला आहे. 3 महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR 9.40% वरून 9.45% आणि 6 महिन्यांच्या कार्यकाळासाठी 9.30% करण्यात आला आहे.

एक वर्षाचा MCLR, जो अनेक ग्राहकांना लागू आहे, 9.45% आहे. दोन वर्षांसाठी MCLR 9.40% वरून 9.45% आणि तीन वर्षांच्या कालावधीसाठी 9.45% वरून 9.50% करण्यात आला आहे.

MCLR म्हणजे काय?

मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड-बेस्ड लेंडिंग रेट किंवा MCLR हा किमान व्याजदर आहे. ज्यावर कोणतीही वित्तीय संस्था किंवा बँक आपल्या ग्राहकांना कर्ज देऊ शकते. हा भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे सेट केलेला बेंचमार्क आहे. जो बँकांना गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यवसाय कर्ज इत्यादीसारख्या विविध कर्जावरील व्याजदर ठरवण्यास मदत करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections साठी MNSची जय्यत तयारी; मुंबईत पुन्हा राज ठाकरेंची तोफ धडाडणार! 'या' दिवशी होणार सभा

Sultan of Johor Cup साठी भारताच्या ज्युनियर हॉकी संघाचे नेतृत्व अमीरकडे, जाणून घ्या वेळापत्रक आणि संघ

Haryana Assembly: हरियाणात विजय मिळाल्यास, काँग्रेसला 'या' पाच मुद्यांवर 'बूस्टर' मिळणार

Akola Violence: अकोल्यात तणाव! दोन गटात राडा, जमावाने दगडफेक करुन कार पेटवल्या

Singham Again Trailer Launch : "माझी लेक बेबी सिंबा" ; सिंघमच्या ट्रेलर लाँचला रणवीरने केलं लेकीचं कौतुक , बायकोविषयी म्हणाला...

SCROLL FOR NEXT