HDFC Bank Loan: देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेने MCLR वाढवला आहे. याचा थेट परिणाम करोडो ग्राहकांच्या गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयवर होणार आहे. MCLR मध्ये वाढ म्हणजे तुमचे मासिक हप्ते वाढणार आहेत.
याशिवाय नवीन कर्जावरही अधिक व्याज भरावे लागणार आहे. MCLR चे नवीन दर आज गुरुवारपासून म्हणजेच 8 फेब्रुवारीपासून लागू होतील. बँकेने काही कालावधीसाठी MCLR मध्ये 10 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे.
एचडीएफसी बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट म्हणजेच MCLR 10 बेस पॉईंट्स म्हणजेच 0.10 टक्के वाढवला आहे आणि आजपासून त्याच्याशी संबंधित सर्व कर्जांचा EMI वाढेल. एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे.
MCLR म्हणजे काय?
MCLR म्हणजे एक प्रकारे बँका त्यांच्या ग्राहकांना कमीत कमी दराने कर्ज देतात. रिझर्व्ह बँकेने संबंधित बँकेला सूचना दिल्याशिवाय कोणतीही बँक MCLR पेक्षा कमी दराने कर्ज देऊ शकत नाही.
कर्ज घेणाऱ्या ग्राहकांवर MCLR वाढल्याने काय परिणाम होतो?
एमसीएलआर वाढल्याने एचडीएफसी बँकेची सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत. आता कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना कर्जावर अधिक व्याज द्यावे लागणार आहे. यामुळे त्यांचा ईएमआय वाढेल. याशिवाय, अधिक व्याजदरामुळे, बँका देखील नवीन लोकांना कर्ज देताना अधिक सावधगिरी बाळगतात. मात्र, MCLR वाढल्याने बँकांचा नफा वाढतो.
बँकेचा एक दिवसाचा MCLR 0.10 टक्क्यांनी वाढून 8.9 टक्के झाला आहे. एका महिन्याचा MCLR 10 बेसिस पॉईंटने वाढून 8.95 टक्के झाला आहे. तीन महिन्यांचा MCLR 10 बेसिस पॉइंट्सने वाढून 9.10 टक्के झाला आहे. सहा महिन्यांचा MCLR 10 बेसिस पॉइंट्सने वाढून 9.30 टक्के झाला आहे.
याशिवाय ग्राहक कर्जाशी संबंधित एक वर्षाचा MCLR देखील 5 बेस पॉईंटने वाढवला आहे आणि तो 9.25 टक्क्यांवरून 9.30 टक्के करण्यात आला आहे. बँकेचा 2 वर्षांचा MCLR आता 9.30 टक्क्यांवरून 9.35 टक्के झाला आहे आणि याशिवाय 3 वर्षांचा MCLR मध्ये कोणताही बदल न करता 9.30 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.