hdfc bank make profit of 16512 cr announce of divident 19 50 rs Sakal
Personal Finance

HDFC Bank : ‘एचडीएफसी’ला १६,५१२ कोटींचा नफा; बँकेतर्फे भागधारकांसाठी १९.५० रुपये लाभांश जाहीर

एचडीएफसी बँकेने आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील जानेवारी-मार्च तिमाहीत १६,५१२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. डिसेंबर तिमाहीत बँकेने १६,३७३ कोटी रुपयांचा नफा मिळवला होता.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एचडीएफसी बँकेने आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील जानेवारी-मार्च तिमाहीत १६,५१२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. डिसेंबर तिमाहीत बँकेने १६,३७३ कोटी रुपयांचा नफा मिळवला होता.

बँकेने मार्च तिमाहीत १७,२५७ कोटी रुपयांचा एकत्रित नफा मिळवला असून, डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत त्यात दोन टक्के वाढ झाली आहे. बँकेने आज तिमाही आर्थिक निकाल जाहीर केले, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. बँकेच्या संचालक मंडळाने ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठी प्रति शेअर १९.५० रुपये लाभांशाची शिफारस केली आहे.

जुलैमध्ये एचडीएफसी बँके आणि तिची मूळ कंपनी गृहनिर्माण विकास वित्त महामंडळ यांचे विलीनीकरण झाले, त्यामुळे वार्षिक आधारावर तुलनात्मक आकडेवारी देता येत नाही, असेही बँकेने म्हटले आहे.

बँकेची एकूण थकीत कर्जांचे प्रमाण (एनपीए) ३१,३७३ कोटी, तर निव्वळ ‘एनपीए’ ८,०९१ कोटी रुपये आहे. एचडीएफसी क्रेडिला फायनान्शिअल सर्व्हिसेसमधील शेअरच्या विक्रीतून झालेल्या ७,३४० कोटींच्या व्यवहारातील नफ्यासह बँकेचा निव्वळ महसूल ४७,२४० कोटींवर पोहोचला आहे.

आर्थिक वर्ष २३-२०२४ साठी, बँकेने ६४,०६० कोटी रुपये नफा नोंदवला आहे बँकेचे मूळ निव्वळ व्याज उत्पन्न तिमाहीत २९,०८० कोटी रुपये आहे, तर इतर उत्पन्न वाढून १८,१७० कोटी रुपये आहे.

कर्जदात्याने एकूण मालमत्तेवर ३.४४ टक्के कोअर नेट इंटरेस्ट मार्जिन नोंदवले आहे. बँकेने संभाव्य बुडीत कर्जाविरूद्ध उच्च तरतुदी केल्या असून, कर्ज मार्जिन स्थिर आहे. बँकेने या तिमाहीसाठी १३,५०० कोटी रुपयांच्या तरतुदी केल्या असून, त्यात १०,९०० कोटी रुपयांच्या फ्लोटिंग तरतुदींचा समावेश होता, असे बँकेने म्हटले आहे.

मार्च तिमाहीत बँकेच्या एकूण शाखांची संख्या ८,७३८ झाली असून, बँकेने या कालावधीत नव्या ६५० शाखा उघडल्या. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये शाखांची संख्या १२ हजारांहून अधिक करण्याचे बँकेचे उद्दिष्ट असल्याचे बँकेचे मुख्य वित्तीय अधिकारी श्रीनिवासन वैद्यनाथन यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT